आज ३० ऑक्टोबर..गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांची पुण्यतिथी.
बेगम अख्तर यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९१४ रोजी झाला. बेगम अख्तर यांचं घराणे म्हणजे गळ्यात पेटी अडकवून दारोदार गाणं गात फिरणार्या नटनी बेडनी चं घराणं. बैठकीत बसून गाणं म्हणणाऱ्या तवायफ यांना आपल्यापेक्षा कमी लेखायच्या. बेगम अख्तर यांचा आवाज, गाण्याचा रियाज, गाण्यासाठीची तळमळ पाहून नर्गिस ची आई जद्दनबाई हीने त्यांना कलकत्त्याला बोलावून घेतलं. तिथल्या तवायफ बेगम अख्तर यांच्याबद्दल आकस बाळगून होत्या. जद्दनबाई यांनी मध्यस्थी केली. सगळ्या मोठ्या तवायफांची आपल्या घरी बैठक बोलावली. त्यात बेगम अख्तरला गायला लावलं. फुल बत्तासे वाटून त्यांच्यावर ओढणी पांघरली. सगळ्यांच्या पाया पडायला लावलं. आणि मग सगळ्या तवायफांनी बेगम अख्तर यांच्या गाण्याच्या मैफिलींना मान्यता दिली. मा.बेगम अख्तर यांनी काही चित्रपटांतून कामं केली. पण त्यांचे मन तिथे रमले नाही. चित्रपट सृष्टीनेही त्यांना स्विकारले नाही. १९४२ च्या सुमारास आलेला ‘रोटी’ हा त्यांचा चित्रपट काहीसा गाजला. पण पुढे कारकीर्द मात्र बहरली नाही. त्यांनी गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. त्यांच्या सुरवातीच्या सगळ्या रेकॉर्ड ‘अख्तरी फैजाबादी’ या नावानेच आहेत. सांसारिक आयुष्यातही त्यांना सुख मिळू शकलं नाही. बाई मग संसारात रमल्याच नाहीत. त्यांच्या पतीला त्यांच्या गाण्याची तळमळ कळली. अख्तरी फैजाबादी या नावानं आत्तापर्यंत त्यांची सांगितीक कारकिर्द बहरली होती. या दु:खातून त्या बाहेर पडून गायल्या लागल्या ते नविन नाव घेवूनच. आता ‘बेगम अख्तर’ या नावानं त्यांची सांगितीक कारकीर्द सुरू झाली. व्यवस्थेचा बेगडी विरोध न करता प्रत्यक्ष कृती करण्यावर बेगम अख्तर यांचा भर होता. त्यांना आकाशवाणीत राष्ट्रीय प्रसारणासाठी बोलावण्यात आलं. त्यांनी गझल गायची तयारी केली तेंव्हा त्यांना सांगितलं की गझल गायला आकाशवाणीवर बंदी आहे. आपण ठूमरी दादरा किंवा इतर उपशास्त्रीय काहीतरी गा. बाईंनी बाणेदारपणे नकार दिला आणि तिथून न गाता परतल्या. प्रसारण मंत्र्यांना हे कळले आणि जेंव्हा आकाशवाणीच्या नियमात दुरूस्ती होवून गझल गायला परवानगी मिळाली तेंव्हाच बेगम अख्तर आकाशवाणीवर गायल्या. .बेगम अख्तर यांचे निधन ३० ऑक्टोबर १९७४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply