काल रात्री गणपती
स्वप्नात माझ्या आला होता
सोंडेनेच डोळे पुसत
गा-हाणे त्याचे सांगत होता
गणेशचतुर्थीचा जणू
धसकाच त्याने घेतला
अनंतचतुर्दशीची वाट
केव्हापासून पाहू लागला
संयोजकांना हवी
देणगीच्या नावे खंडणी
चार आण्याचा गणपती
बारा आण्याची मांडणी
किडनॅप केल्यासारखे मला
तोंड झाकून आणले
कसे आणले, कुठे नेले
काहीच नाही कळले
भजन सेवेसाठी
भजनी मंडळ आले
ऐकायला ते अन मी सोडून
संयोजकही नाही थांबले
ऑर्केस्ट्राच्या रात्री
मला झोप आवरेना
‘वन्स मोअर’ करता करता
कुणीच आवरते घेईना
‘ऐका दाजीबा’, काँटा लगाची
शिसारी मला आली
रुचिपालट म्हणून एकाने
लावणीची कॅसेट लावली
आधीच माझे कान मोठे
त्यात स्टिरिओ जोर करतोय
कानठिळया बसून बसून
बहिरा व्हायचाच राहिलोय
विसर्जनाच्या मिरवणुकीत
हाल माझे सांगवेना
स्पिकर वाजंत्रीच्या मागे
मला कुणीच पाहीना
उठून पळावे म्हटले तर
चौघानी पकडून ठेवलेले
अंधार नको कुठे म्हणून
लख्ख लाईट लावलेले
विसर्जनाच्या वेळी मात्र
मन भरून- नव्हे घाबरून गेले
कारण ‘पुढच्या वर्षी यायचं’
आमंत्रण सर्वांनीच दिले
आता मात्र मी असाच
‘आईकडे’ जाणार आहे
नवरात्रात तिनं यावं की नाही
विचार करायला सांगणार आहे
कुणाबद्दल माझी तक्रार नाही
टिळकांना मात्र मी शोधतोय
जनजागरणाची त्यांची कल्पना काय असावी ?
यावर सध्या विचार करतोय
Forwarded Post from Whatsapp
Leave a Reply