गरीबाला आपल्या भोकं पडलेल्या
जुन्या कपडयांची लाज वाटत असते…
श्रीमंतांना आपल्या नवीन कपड्यांना
भोक पाडून ते परिधान करण्यात मजा वाटत असते…
एकीकडे गरीबाला कपड्याने आपले
अंग पूर्णपणे झाकायचे असते…
श्रीमंताला मात्र त्यात समाजात
कमीत कमी कपड्यात वावरायचे असते…
गरीबाला फक्त आपल्या शरीरातील
पोटाची खळगी भरण्याची काळजी असते…
श्रीमंताला आपले शरीर सतत तरूण- तजेलदार
कसे दिसेल याचीच काळजी वाटत असते…
एकीकडे गरीबाची चामडी
उन्हा-तान्हात काम करून काळी पडत असते…
श्रीमंताने तेच उन न खाल्ल्यामुळे
त्याची चामडी पांढरी पडत असते…
गरीबाने शरीराचे चोचले
न पुरविल्यामुळेच त्याचे जीवन संपत असते…
श्रीमंताने शरीराचे चोचले
अधिक पुरविल्यामुळे त्याचे जीवन संपत असते…
कवी – निलेश बामणे.
— निलेश बामणे
Leave a Reply