महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी लिहिलेल्या ‘लेट्स किल गांधी’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद नुकताच बाजारात आला. या पुस्तकाच्या निमित्ताने गांधीहत्येचे कारस्थान, घटनेचा तपास आणि खटल्याविषयीच्या नोंदी तपशिलाने पुढे आल्या आहेत. या नोंदी मांडताना लेखकाने गांधीजींच्या शेवटच्या दिवसातील घटना मांडताना त्यांच्या विचारांचीही मार्मिक मिमांसा केली आहे.
30 जानेवारी, 1948 नंतर वेगवेगळ्या लोकांनी गांधीजींच्या हत्येविषयी आपापले सिद्धांत मांडले. त्यातील काही अगदी निराधार होते. अनेक खोट्या गोष्टी सत्य म्हणून सांगण्यात आल्या, अनेक अर्धसत्ये पूर्णपणे खरी असल्याचा आभास तयार केला गेला. हिदूंचे नुकसान करणार्या गांधीजींच्या पाकिस्तानधार्जिण्या वृत्तीमुळे चिडून नथुराम गोडसेने हे कृत्य केले, म्हणून त्या कृतीला गौरवण्यातही आले. ‘महात्मा गांधीच फाळणीसाठी जबाबदार होते’, ‘महात्मा गांधी मुसलमानांना पाठीशी घालत होते आणि हिंदूना त्यांनी वार्यावर सोडलं होतं’, ‘महात्मा गांधींना आणखी जगू दिलं असतं तर त्यांनी हिंदू राष्ट्र संकल्पनेचं अधिक नुकसान केलं असतं’, ‘महात्मा गांधींनी भारत सरकारला 55 कोटी रुपये पाकिस्तानला देण्यासाठी भाग पडले.’ ‘महात्मा गांधींनी हिंदू निर्वासितांच्या हलाखीकडे दुर्लक्ष केले आणि फाळणीच्या वेळी भारतात राहिलेल्या मुसलमानांचे लाड केले’, ‘भारतमातेला वाचवण्यासाठी महात्मा गांधींना मारणे हा एकच उपाय होता’. महात्मा गांधींच्या वधाचे समर्थन करण्यासाठी कडव्या उजव्या विचारसरणीचे हिंदुत्ववादी आणि गोडसेचे पाठीराखे यांनी तेव्हापासून आजपर्यंत अशा असत्याचा प्रचार सुरू ठेवला आहे.पण त्यात काही तरी सत्य आहे का ? भारतातील एक पिढी हे सर्व सत्य आहे या समजुतीवर वाढली आहे. जेव्हा गांधींवर हल्ला ाला तेव्हा ‘दुसरा गाल पुढे करणार्या’ गांधीवाद्यांच्या मौनामुळे अशा विधानांना नकळत पुष्टीच मिळत गेली. 30 जानेवारी, 1948 च्या हल्ल्याआधी गांधींवर जीवघेण्या हल्ल्याचे चार प्रयत्न झाल्याची अधिकृत नोंद आहे, हे कुणाला ठाऊक आहे का ? अयशस्वी ठरलेल्या पाच प्रयत्नांपैकी चार
प्रयत्न झाले, तेव्हा मुस्लीम लीगच्या कार्यक्रमात पाकिस्तानचे नावदेखील नव्हते. हे चारही प्रयत्न
अतिरेकी उजव्या हिंदू चारसरणीच्या उच्चवर्णीय आणि पुण्यातील लोकांनी केले होते. चारांपैकी तीन प्रयत्नांमध्ये नारायण आपटे आणि गोडसेची टोळी होती आणि त्यातील दोन प्रयत्नांत नथुराम पकडला गेला होता.दुसरीकडे काँग्रेस सरकार आणि मंत्रिमंडळातील काही सदस्यांना या वृद्ध व्यक्तीची लुडबूड पसंत नव्हती. महात्म्याला हुतात्मा ठरवून मग त्याच्याबरोबर जगणे त्यांच्या दृष्टीने जास्त सोयीस्कर होते. गृहमंत्री सरदार पटेल यांना मिळालेल्या एका गुप्त अहवालानुसार, पोलीस दलातील आणि सरकारी सेवेतील अनेक जण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेचे गुप्तपणे सदस्य झाले होते आणि या अतिरेकी हिंदू संघटनांच्या उपक्रमांना प्रोत्साहन देत त्यांच्या विचारसरणीचे समर्थन करत होते. गांधीहत्येच्या टोळीमधील सभासद हे या अतिरेकी संघटनांचेच शिलेदार होते. त्या दोघांमध्ये काही गुप्त संबंध असला पाहिजे का ? ज्या पद्धतीने चौकशी केली गेली आणि गांधींच्या जीविताचे रक्षण करण्यात पोलिसांनी जी उदासीनता दाखवली ते बघता असे वाटू शकते की, चौकशीमधून काही शोधण्यापेक्षा काही लपवण्याचाच प्रयत्न जास्त केला गेला, या म्हणण्याला बळकटीच मिळते. 20 ते 30 जानेवारी 1948 या काळात पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांमधून गांधींची हत्या टाळण्याऐवजी हल्लेखोरांचे काम सुलभ करण्याच्या दिशेनेच मुद्दाम प्रयत्न केले का, असे वाटू शकते.गांधी ब् िटिशांना हुसकावून लावण्यात यशस्वी ठरले. दुर्दैवाने, त्यांच्या राजकीय वारसांना त्यांच्या नैतिकतेचे अनुसरण करता आले नाही. त्यांच्या दृष्टीने गांधी एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांची उपयुक्तता संपली होती आणि आता त्यांचा फक्त उपद्रवच होत होता. काँग्रेस बरखास्त करावी अशी सूचना गांधींनी केली होती. फाळणीची प्रक्रिया मागे घ्यावी म्हणून ते पाकिस्तानमध्ये
ायला तयार होते. समाजनिर्मितीच्या त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी काँग्रेसला अल्पकालीन, राजकीय हेतूने प्रेरित झालेली धोरणे रद्द करायला भाग पाडले. समाजसुधारणा चळवळ चालू करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. संथ ग्रामोद्योग प्रतिरुपाला पसंती देऊन त्यांनी भारताच्या जलद औद्योगिकरणाला विरोध केला. त्यांना वाटत होते की मंत्र्यांनी जनतेचे सेवक म्हणून वागावे आणि आपले प्रशस्त बंगले निर्वासितांना आसरा देण्यासाठी खाली करावे. गांधींच्या राजकीय वारसांना अशा अव्यवहारी वृद्ध व्यक्तीचे अस्तित्व कसे सहन होणार? काही ना काही कारणाने ते या परिस्थितीतून अदृश्यच झाले तर काय नुकसान होणार होते ? समाजातील काही घटकांना त्यांच्याबद्दल राग होता. तो राग असाच उसळत राहून त्यात शांतिदूताची आहुती पडली तर काय फरक पडणार होता ? देशाची स्पष्ट फाळणी करून भारत हे बिगरमुस्लीम राष्ट्र तयार करण्याच्या रा. स्व. संघ आणि हिंदू महासभेच्या योजनांना त्यांनी खो घातला म्हणून या संघटनांचा त्यांच्यावर राग होता.गांधींच्या हत्येला जवळजवळ साठ वर्षे झाली; पण अजूनही किती तरी गोष्टी अंधारातच आहेत. भारताची फाळणी आणि नंतर झालेला मानवतेचाच संहार हे विषय अजूनही ज्वलंत आणि संवेदनशील आहेत. अतिरेकी हिंदुत्ववाद्यांनी फाळणी आणि नंतरच्या परिणामांमध्ये त्यांच्या दृष्टीने गांधींची भूमिका कशी होती ते अत्यंत रंगवून सांगित े आहे तर गांधीवाद्यांनी या विषयावर गप्प बसण्याची भूमिका घेतली आणि काँग्रेसजन आपल्यातच गर्क राहिले. त्यामुळे गोडसेवाद्यांच्या म्हणण्याला जास्त जोर मिळत गेला. ‘लेट्स किल गांधी’ हे पुस्तक लिहिताना, आधी प्रसिद्ध झालेली पुस्तके, खून खटल्याच्या नोंदी, चौकशीचे अहवाल, बचाव पक्षाच्या वकिलांनी आणि न्यायाधिशांनी लिहिलेली पुस्तके, वर्तमानपत्रांतील बातम्या, गांधी कुट
ंबात वाढल्याने माझ्या कानावर आलेल्या घटना-गोष्टी, गांधींच्या निकटवर्तीयांना बसलेले आश्चर्याचे धक्के आणि तोंडी ऐकलेल्या कहाण्या यांचे संदर्भ घेतले आहेत.1940 च्या दशकाच्या मध्यास भारताची जी स्थिती होती, त्याच परिस्थितीतून आज आपला देश जात आहे. संधिसाधू आणि स्वार्थी राजकारण्यांनी मतदारसंघाचे जाती आणि उपजातीनुसार विभाजन करून लोकशाहीची थट्टा चालवली आहे. स्वार्थी मुस्लीम धर्मगुरू आणि त्यांच्यातील संधिसाधू नेतृत्व यांच्या
कृत्यांमुळे अतिरेकी हिंदुत्ववाद्यांना बळ चढले आहे आणि त्यांनी मुसलमानांना भारतातून घालवून देण्याची आणि त्यांच्या जन्मभूमीतच त्यांना गुलाम बनवू पाहण्याची आपली मोहीम पुन्हा सुरू केली आहे. हिदू श्रेष्ठत्ववाद्यांचा एक गट गांधी आणि आंबेडकरांच्याही पूर्वी अस्तित्वात असलेला, ब्राह्यणी वर्चस्व असलेला समाज पुन्हा निर्माण करू पाहत आहे. आपल्याला पुन्हा मानवी संहार नको आहे. आम्हाला कोणत्याही जातीचे श्रेष्ठत्व नको आहे. धर्माधर्मांमध्ये आम्हाला युद्ध नको आहे. जातिभेद करणे म्हणजे जातीय शुद्धीकरणाची पहिली पायरी होय. आपल्याला हिटलर आणि मिलेसेव्हिचच्या काळात परत जायचे नाही. दादागिरी करणार्या एखाद्या महाशक्तीच्या मर्जीवर जग अवलंबून राहू शकत नाही. आपण भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र होऊन एकत्रित देशाचे हे गांधींचे स्वप्न पूर्ण करायला हवे. भारताला रा . स्व. संघ किवा हिंदू महासभेच्या ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेची गरज नाही. आपल्याला पुन्हा फाळणी नको. प्रदेशाचीही नको आणि हृदयांचीही नको.(अद्वैत फीचर्स)
— तुषार गांधी
Leave a Reply