आयुर्वेदानुसार गायीचे दूध आणि त्यापासून मिळणारे दही, ताक, लोणी आणि तूप अमृताचे भांडार आहे. केवळ गायीच्याच पाठीच्या कण्यात ‘सूर्यकेतू’ नाडी असते. इतर प्राणी व मनुष्य ज्यांना ग्रहण करू शकत नाहीत, त्या सूर्याच्या गो-किरणांना सूर्यकेतू नाडी ग्रहण करते. ही नाडी क्रियाशील होऊन पिवळ्या रंगाचा एक पदार्थ स्रवते, ज्याला ‘स्वर्णक्षार’ म्हणतात. याच कारणास्तव देशी गायीचे दूध, लोणी आणि तूप सुवर्णकांतीचे असते.
जे आयुष्यभर देशी गायीच्या दुधाचे सेवन करतात, ते निश्चितच निरोगी, वीर्यवान, बुद्धिमान, शक्तिशाली, आणि दीर्घायू होतात तसेच त्यांच्या विचारांमध्येही सात्विकता राहते. फक्त देशी गायीचेच दुध हितकार आहे; जर्सी, होल्सटीन किंवा त्यांच्या संकरीत उपजातींचे नव्हे. डेअरीच्या प्रक्रियेमुळे (उदा. पाश्चुरायझेशन) दुधाचा सात्विक प्रभाव आणि पोषक तत्वे नष्ट होतात.
डोळे दुखणे – उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ होत असल्यास रात्री पापण्यांवर दुधात भिजवलेले कापसाचे बोळे ठेवल्यास डोळ्यांची लाली आणि जळजळ दूर होते.
आम्लपित्त – आम्लपित्ताच्या रुग्णाने दिवसातून दोन-तीनदा गार दुध एकेक घोट पीत त्यासोबत थोडेथोडे पाणी प्यायला पाहिजे. दुध गार केलेले असावे, फ्रिजचे नव्हे !
रक्तपित्त – ( शरीरात निष्कारण कुठूनही रक्तस्राव होऊ लागणे ) : कच्च्या दुधात २ ग्रॅम गोखरू चूर्ण अथवा शतावरी किंवा जेष्ठमध चूर्ण मिसळून प्यायल्याने लाभ होतो.
बद्धकोष्ठ ( मलावरोध ) : गरम दुधाबरोबर इसबगोलची पूड किंवा गुलकंद घेतल्याने मलावरोध तसेच मूळव्याधीत लाभ होतो.
आतड्यांचे रोग – जेवणापूर्वी एक चमचा कोमट दुध घेऊन हळूहळू पोट आणि नाभीवर मालिश करावी. एक तास विश्रांती घेऊन मग जेवण करावे. जेवणानंतर लगेच लघुशंका केल्याने आतड्यांना येणारी सूज आणि इतर आजारही दूर होतात तसेच आतडे मजबूत बनतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply