साधारणतः वयाची ५० शी ओलांडली की काहिंना हळूहळू गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो, त्याचे कारण शरीरातील सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्याची क्रिया मंदावणे.
त्यावर हुकमी उपाय म्हणून गुडघे बदलणे (कृत्रिम गुडघे) असे डाॅक्टरांकडून सुचविले जाते.
जे लोक श्रीमंत आहेत त्यांना हा इलाज परवडतो, त्याची कारणे फक्त श्रीमंती असेही नाही, कित्येक वेळा हा खर्च विमा कंपनीकडून वसुलतात. पण सामान्यांचे, मध्यमवर्गीयांचे काय?
अनेक वेळा कुणीतरी सांगितले म्हणून हे लोक अशा महागड्या उपचारासाठी कर्ज काढून तयार होतात.
परीणाम…. अपयश!
निसर्गाची किमया अशी की त्याने प्रत्येकाला दोन गुडघे दिले ते त्याच्या आयुष्यभर पुरावे म्हणून; पण आपणच त्याची आयुष्यभर काळजी न घेतल्यामुळे ही परिस्थिती ओढवते.
बरं हे कृत्रिम गुडघे बसविल्यामुळे २-३ वर्षे बरे वाटते आणि पुन्हा हरीदासाची कथा मूळ पदावर.
यावर एक भारतीय निसर्ग उपचार पद्धती आहे. जिचा लाभ लाखो गुडघादुखीने त्रस्त व जे भलीमोठ्ठी रक्कम खरंच करू शकत नाहीत त्यांच्यासाठी…..
शहरात नाही पण खेडोपाडी न लावता कोणत्याही प्रकारचा लागवड खर्च न करता सहजपणे उगवणारी व आपणा सर्वांना परिचित असलेली बाभूळ या दुखण्यावरचा सोपा उपाय आहे.
अमेरिकेत हे झाड नाही. नाहीतर आतापर्यंत त्यांनी हर्बल नावाखाली हे औषध आपल्याला देऊन करोडो रूपयांचा चुना लावला असता.
असो, या बाभळीच्या शेंगा वाळवून त्याचे चूर्ण तयार करून रोज सकाळी एक चमचा थोड्या कोमट पाण्याबरोबर घ्या. २-३ महिन्यात गुडघेदुखी गायब. औषध जवळपास फुकट आणि लाखो रूपयांची बचत.
बाभळीच्या शेंगा शोधत बसण्यापेक्षा बाभळीचा डिंक जो खाण्याचा डिंक म्हणून विकत मिळतो. तो गाईच्या तूपात तळून गरम पाण्याबरोबर घ्यावा. किंवा लाडू करून खावेत. जोडीला खोबरेल तेल पण दोन चमचे दोन वेळा घ्यावे.
— `आरोग्यदूत’ WhatsApp ग्रुपवरुन
सुबबल की काटेरी बबल
बाभळीच्या झाडांमध्ये 2-3 प्रकार आढळतात, शेंगा सगळ्यांच्या दिसायला तरी सारख्याच असतात, त्यापैकी कोणत्या झाडाच्या शेंगा वापरायच्या? काटेरी झुडुपाच्या कि उंच असणाऱ्या देवबाभळीच्या? एखादा फोटो पोस्ट केल्यास शंका दूर होईल. धन्यवाद