<रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी म्हणजेच २५ फेब्रुवारी रोजी २०११-१२ या वर्षासाठी रेल्वे बजेट सादर केले. या वर्षीच्या अर्थसंकल्पावर पश्चिम बंगाल निवडणुकीचे सावट असणार आहे. त्यामुळे ममता या वर्षीच्या रेल्वे बजेटमध्येही काही नवीन घोषणा केल्या. मा्त्र त्यांनी गेल्या वर्षी सादर केलेल्या घोषणा किती प्रत्यक्षात उतरल्या किती नाही हे तुम्हीच
पाहा. ममता बॅनर्जी यांनी २०१०-११ दरम्यान सादर केलेल्या बजेटमधील काही ठळक मुद्दे….*>ाबदारीनुसार परवानाधारक हमालांसाठी विमाची सुविधा.* आयआयटी आणि डीआरडीओच्या साथीने रेल्वे शोध केंद्राची स्थापना केली जाईल.* अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय सुरु केला जाईल. सिक्कीमची राजधानी गंगटोक रंगपोपर्यंत रेल्वेलाईन जोडली जाईल.* अंदमान-निकोबारमध्ये पोर्ट ब्लेयरपासून दिगलीपूरसाठी रुळ टाकली जातील.* हिमाचल प्रदेशमधील बिलासपूरपासून जम्मू काश्मीरच्या लेहपर्यंत रेल्वेमार्गाचा विस्तार होणार.* हाय स्पीड पॅसेंजर कॉरिडोरसाठी नॅशनल हाय स्पीड रेल अथॉरिटीची स्थापना केली जाणार.* नवीन मार्गांसाठी ४४११ कोटी रुपये दिले जाणार.* अमरावतीजवळ वॅगन दुरुस्ती केंद्र बनवंल जाईल.* १० ऑटोमोबाइल पूरकउद्योग केंद्र बनवले जातील.* रेल्वेसाठी ज्या कुटुंबाकडून जमीन घेतली जाईल त्या कुटुंबातील एका सदस्याला रोजगार उपलब्ध करणार. त्यांच्याकडून जमीन जबरदस्ती घेतली जाणार नाही.* पश्चिम बंगाल आणि बांगलादेशदरम्यान विशेष रेल्वेचा प्रस्ताव.* पूर्वोत्तर राज्यांच्या विकासासाठी अलग मास्टर प्लॅन बनवला जाणार.* जलद गाड्यांसाठी समर्पित प्रवासी कॉरिडोर बनवला जाईल.* १० वर्षांच्या आत सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची सुविधा मिळणार.* १६ मार्गांवर नवीन पर्यटक रेल्वे आणल्या जातील.* ८० हजार नवीन डब्ब्यांची खेरदी केली जाईल.* एसी सर्विस चार्ज २० ते ४० रुपयांपर्यंत घटवला जाईल.* धान्य आणि रॉकेलवर माल भाडे घटला.* २१ रेल्वेच्या मार्गांची लांबी वाढवणार.* २०१०- २०११ या आर्थिक वर्षात ५ ४ नवीन रेल्वे सुरु केल्या जातील.* १० नव्या दुरंतो रेल्वे चालवल्या जातील.* माल भाड्यात कोणतीही वाढ नाही.* मुंबईमध्ये १०१ लोकल रेल्वे सुरु केल्या जातील.* मोबाइवरुन तिकीट खरेदीची व्यवस्था होणार. आयआयचीसारख्या मोठ्या शिक्षण संस्थांसह न्यायालय, रुग्णालयातही याची व
्यवस्था केली जाईल.* रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष योजना अंमलात आणल्या जाणार.* राष्ट्रकुल खेळांसाठी विशेष रेल्वे चालवल्या जातील.* डबल डेकर रेल्वे चालवल्या जातील.* खेळाडूंसाठी नोकरीच्या सुविधा उपलब्ध करणार.* १ वर्षांत १००० किलोमीटर रुळ टाकण्याचं काम पूर्ण होणार.* ३१ मार्चआधी ११७ नव्या रेल्वे सुरु होणार.* प्रवाशांच्या सुविधांसाठी १३०० कोटी रुपयांची तरतूद.* रायबरेली इथल्या कोच कारखान्याचं काम १ वर्षाच्या आत सुरु होणार.* रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी काही योजना सुरु होणार.* रेल्वे सुरक्षा मजबूत करण्यासाठी आरपीएफमध्ये बदल करणार.* रेल्वे बाटलीबंद पाण्याचे सहा प्रकल्प सुरु करणार.* रेल्वेसाठी व्हिजन २०२२ सादर करणार.* रेल्वेच्या प्रवेश परिक्षा आता हिंदी, इंग्लिशसह उर्दूमध्येही होणार.* रेल्वेच्या कोणत्याही विभागाचं खासगीकरण होणार नाही.* भविष्यकालीन उपाययोजनांसाठी विशेष फंडाची गरज: ममता बॅनर्जी.* पर्यटन स्थळ रेल्वेशी संलग्न होणार.लाभापेक्षा सामाजिक जबाबदारी निभवण्याची जास्त गरज असल्याचं रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी बजेट सादर करण्याआधी सांगितले.
— स्नेहा जैन
Leave a Reply