कृष्ण कृष्ण कृष्णाची गायगोमातेला म्हणतात मायदूध सार्यांना शक्ती देतेलोणी स्नेह वाढवितेगाईपासून सारे मिळतेगोमूत्राची औषधे बनवती शेणापासून खते होतीमळे-शेते फोफावती धान्य सकस मानवा देतीगाईचा गोर्हा शेतीसाठीसारा देहच लोकांसाठी ऐसी गुणी गोमातातिचे व्हावे रक्षणकर्तागुण ध्यानी धरावेइतरांसाठी झिजावेभारती समृद्धी नांदावीश्रीकृष्णाला आठवावेगोमातेला वंदावे
— सौ. सुधा नांदेडकर
Leave a Reply