विविध आणि विविध महिमा विविध थोर पुरुषांनी गायींचे महत्व वर्णन करणारे जे जे लिहिले आहे. त्यांचे एकपात्र संकलन गो माहात्म्य सांगणारी गोसूक्ते या पुस्तकात प्रा. विजय यंगलवार यांनी परिश्रमपूर्वक केले आहे.
पृ. 40
किं. 40 रू.
ISBN : 978-93-80232-20-1
माणसाच्या आरोग्याच्या व अन्यही प्रकारच्या वाढत्या चिंता दूर करण्याचे गायीचे सामर्थ्य लक्षात घेऊन नचिकेत प्रकाशनाने गायी संबंधी तीन उत्तम, संग्राह्य व अत्यंत उपयुक्त पुस्तके प्रकाशित केली आहेत. 1) देवस्वरूपा कामधेनु : वैज्ञानिक महत्त्व (2) पंचगव्य औषधोपचार आणि (3) गो माहात्म्य सांगणारी गोसूक्ते ही तीन पुस्तके होत. तीनही पुस्तके वेगवेगळ्या पैलूचा परामर्श घेणारी आहेत.
गायीचे माहात्म्य जितके वर्णावे तितके थोडे आहे. अशा या कामधेनुचे विविध ग्रंथात विविध थोर पुरूषांनी विविध देशात विविध भाषां मध्ये वेगवेगळे जे गोमाहात्म्य वर्णन केले आहे. त्याचे अत्यंत मनोरम व वाचनीय व संग्राह्य संकलन गो माहात्म्य सांगणारी गो सुक्ते या रूपाने नचिकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकातील गोमाहात्म्य सांगणारा थोडा भाग असा.
गाईची उत्पत्ती गाईच्या उत्पत्तीची कथा “शतपथ ब्राम्हण” ग्रंथात पुढीलप्रमाणे सांगितली आहे.
दक्ष प्रजापतीने प्राणिसृष्टी निर्माण केल्यानंतर थोडे अमृत प्राशन केले. त्या अमृताने तो संतुष्ट झाला. त्यावेळी त्याच्या नाकातून जो श्र्वास बाहेर पडला. त्याचा सुगंध सर्वत्र दरवळला. त्या श्र्वासातून एक “गाय” जन्मास आली. सुंगधातून जन्मल्यामुळे दक्ष प्रजापतीने तिचे “सुरभी” असे नाव ठेवले. सुरभीपासून अनेक गाई जन्मास आल्या. त्यामुळे सुरभी ही संपूर्ण गोवंशाची माता, जननी ठरली.
या सुरभीने एकदा तप आरंभिला. ब्रम्हदेव त्या घोर तपाने प्रसन्न झाला. त्याने सुरभीला अमरत्व प्रदान केले. तसेच त्रैलोक्याच्या वर असलेला एक स्वर्गही तिला बहाल केला; जो स्वर्ग “गोलोक” या नावाने ओळखला जातो. सुरभी या गोलोकात नित्य निवास करते आणि तिच्या कन्या, सुकन्या भूलोकात पृथ्वीवर राहतात. या गोलोकाचा अधिपती “गोविंद” अर्थात भगवान श्रीकृष्ण हा आहे.
सुरभी एकदा इंद्रदेवाच्या दारावर भगवान श्रीकृष्णाच्या भेटीला गेली आणि पशुराज्याच्या विषयांची श्रीकृष्णाची सदिच्छा पाहून तिने त्यांना आपल्या गोलोकाचा “इंद्र” म्हणून निवडले. भगवान श्रीकृष्णाची गोभक्ती सर्वत्र प्रसिद्धच आहे. त्याने आपले लहानपण व बालपण गोकुलात घालवले, असे महाभारतात सांगितले आहे.
गोरूप पृथ्वी गाय हे पृथ्वीचे प्रतीक मानलेले आहे. ज्या ज्या वेळी दैत्य, असुर माजतात व अधर्म वाढतो, त्यावेळी पृथ्वी “गोरूप” घेऊन भगवान विष्णूला शरण जाते आणि अवतार घेण्यासाठी प्रार्थना करते. पृथ्वीचे व गाईचे हे एकरूपत्व पृथू राजाच्या आख्यानातही सांगितले आहे.
पृथू राजाचा राज्याभिषेक झाल्यावर त्याचे सर्व प्रजाजन अन्न, वस्त्र करीत त्याच्याकडे आले आणि पृथ्वी अन्न पिकवीत नाही म्हणून त्याच्याकडे गऱ्हाणे करू लागले. त्यावेळी पृथू राजाला पृथ्वीचा राग आला आणि पृथ्वीला शासन करण्यासाठी त्याने शरसंधान केले. तेव्हा पृथ्वी घाबरली व गाईचे रूप घेऊन धावत-पळत सुटली. पृथू राजा तिच्या पाठीमागे धावू लागला. तो काही केल्या तिची पाठ सोडीना. तेव्हा गोरूप पृथ्वी पृथूला शरण गेली. तिने त्याला विचारले, ङ्गहे राजा! पृथ्वीवरच्या औषधी व वनस्पती मी खाऊन त्या पचवल्या आहेत, त्या तुला परत हव्या असतील तर माझ्या दुग्ध रूपाने त्या तुला मिळतील. परंतु तू एखादा “वत्स” आणून माझ्या कासेला, स्तनाला लाव आणि औषधी वनस्पती दोहून घे.
पृथू राजाने मग तसे केले. त्याशिवाय मग अन्य देव, ऋषी, गंधर्व, मानव या सर्वांनीही त्या प्रसंगी आपापले “वत्स” गोरूप पृथ्वीच्या कासेला लागून आपापल्या इच्छित वस्तू दोहून घेतल्या.
गाय ही इतरही अनेक वस्तूंचे व व्यक्तींचे प्रतीक बनली आहे. ङ्गइमे लोका जौङ्घ म्हणजे हे सगळे लोक अर्थात विश्र्व गोरूप आहे असे शतपथ ब्राम्हणात (3.9.8.3) म्हटले आहे. ङ्गयज्ञो यै गौङ्घ म्हणजे यज्ञ म्हणजेच गाय होय असे तैत्तरिय ब्राम्हणात (3.9.8.3.) म्हटले आहे. तसेच ङ्गअन्नं यै गौङ्घ अर्थात अन्न म्हणजेच गाय होय. ङ्गविराजोवा एतद्रुपं यद् गौङ्घ म्हणजेच गाय ही विराजाचे (सकल सृष्टीचे) रूप आहे. (तां.ब्रा.4.9.3.) गाय हे वाणीचेही प्रतीक आहे. ङ्गवाचं धेनुनुपासीतङ्घ म्हणजे वाचारूपी धेनूची उपासना करावी. (बुद्ध 5.8.1.) गाय ही गायत्रीचेही प्रतीक आहे.
ब्रम्हदेव ध्यानस्थ बसला असता त्याच्या मुखातून एक “धेनू” गाय बाहेर पडली. ती दुसरी कोणी नसून “गायत्री”च होती. भारतीय संस्कृतीत गाय ही विविध प्रकारे विश्र्व व्यापून उरली आहे. म्हणून महाभारतात पुढीलप्रमाणे म्हटले आहे.
यदा सर्व मिदं व्याप्त जगत्स्य वरज गमम्। गो माहात्म्य सांगणारी गोसूक्ते तां धेनु शिरता नन्द्रे भूतभव्यस्य मातरमे।। (महाभारत, अनुशा.80-15) नचिकेत प्रकाशन प्रा. विजय यंगलवार किंमत : 40 रू.
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply