श्रीमती सुलोचना चव्हाण यांनी आपल्या घरंदाज, वैविध्यपूर्ण गायकीतून मराठी रसिकांवर अनेक दशके पेमाचे अधिराज्य गाजविले आहे. सुलोचनाबाईंना अलिकडेच महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! सुलोचना चव्हाण यांचे व्यक्तीमत्व पाना आडच्या फुलासारखं विनम्र. सुलोचनाबाईंचा जन्म १३ मार्च १९३३ चा. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांनी गायनाला प्रारंभ केला. बालपणी त्या मेळयातून श्रीकृष्णाची भूमिका करायच्या. उर्दू नाटकातून छोटया मजनूची भूमिका करायच्या. तो काळच मेळयांनी भारावून गेलेला होता. मुंबई आणि कोल्हापूर, सांगलीकडे असे अनेक मेळे स्थापन झाले होते त्यातूनच मराठी रंगभूमी आणि चित्रपटाला अनेक मान्यवर कलावंत प्राप्त झाले. श्याम सुंदर, सी. रामचंद्र आदी संगीतकारांच्या मार्गदर्शनाखाली सुलोचनाबाईंनी अनेक हिंदी चित्रपटात पार्श्वगायन केले. कालेबादल, ढोलक, कृश्णसुदामा या व अशा सुमारे 100 च्या वर हिंदी चित्रपटांतून पार्श्वगायन करणाऱया सुलोचनाबाई चव्हाण यांचा लावणी गायनात स्वतंत्र ठसा उमटत गेला व कालांतराने त्या मराठी चित्रपटातील लावणी गायनाच्या सम्राज्ञी ठरल्या. ओठावर लावणी आणि चेहऱयावरील भाव अभंगाचे असे सुलोचना चव्हाण यांचे स्टेजवरील रूप असे. सुलोचनाबाईंचा हिंदी, मराठी चित्रपट गायन क्षेत्रात पार्श्वगायनाचा असा आदरयुक्त दरारा आहे की त्यांच्या वाढदिवसाला रेडियो सिलोन दरवर्षी १३ मार्च रोजी सकाळी ७.३० ते ९ सुलाचनाबाईंची गाणी प्रसारित करते.
सुलोचनाबाईंचा विवाह ष्यामराव चव्हाण या संगीतकारासोबत झाला. आचार्य अत्रे यांच्या ‘हिच माझी लाडकी` या चित्रपटात त्यांनी पहिली लावणी गायली त्यानंतर ष्यामराव चव्हाण यांनी संगीत दिग्दर्षन केलेल्या ‘कलगी तुरा` चित्रपटात सुलोचनाबाईंनी लावणी गाय
ली, कवी जगदीष खेबुडकर यांच्या सिध्दहस्त लेखणीतून कागदावर उतरवलेल्या ‘नाव गाव कषाला पुसता, मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हंत्यात लवंगी मिरची` या लावणीच्या गायनाने सुलाचनाबाई लोकप्रियतेच्या षिखरावर पोहोचल्या. वसंत पवार, विश्वनाथ मोरे, राम कदम, वंसत देसाई, बाळ पळलुले आदी संगीतकारांसोबत पार्श्वगायनाचे काम सुलोचनाबाईंनी केले.
बोर्डावरची लावणी त्यांनी माजघरात पोहोचविली इतकेच नव्हे तर आपल्या लावणी गायनाच्या कार्यक्रमातून अनेक षाळा, महाविद्यालये, इस्पितळे, स्मषानभूमी यांच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केली. मल्हारी मार्तंड, केला इषारा जाता जाता, सवाल माझा ऐका, रंगू निघाली बाजाराला, संरूंगा म्हत्यात मला, गावाची इज्जत आदी चित्रपटातील सुलोचना चव्हाण यांची गाणी गाजली.
कस काय पाटील बरं हाय का? जाळीमदी पिकली करवंद, कळीदार कपोरी पान, फड सांभाळ तुऱयाला ग आला तुझ्या उसाला लागल कोल्हा, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा या व अषा अनेक लावण्यांद्वारे मराठी रसिकजनांवर सुलोचनाबाईंनी भूरळ घातली. लता मंगेषकर पुरस्काराने सुलोचनाबाईंच्या गानतपश्चर्येचे अक्षरष: सोने झाले आहे.
डॉ. प्रकाश खांडगे
(`महान्यूज’च्या सौजन्याने)
— डॉ. प्रकाश खांडगे
Leave a Reply