एक चमचा मेथ्या रात्री भिजत घाला. त्या भिजलेल्या मेथ्या (भिजवलेल्या पाण्यासहित), एक ते दीड वाटी नारळाचे दूध, नागरमोथा, जटामांसी, गवलाकचरा, ब्राह्मी, आमलकी, मंजिष्ठ, माका आणि मेंदी सर्व एकेक चमचा, असं सगळं चांगलं घोटून (मेथ्या मिक्सरमधून आधी काढून घ्यायच्या किंवा सगळेच मिक्सरातून काढून घ्यायचे) मिक्स करा. गरजेप्रमाणे पाणी / नारळाचे सेकंडरी दूध (एकदा चोथा पिळून झाल्यावर परत तो पाणी घालून मिक्सरमधून काढले की जे पातळ ना दूध मिळते ते) घाला. केसाला मेंदी लावताना जी कन्सिस्टन्सी तयार करतो तीच करा. एकेका बटेला डोक्यापासून केसाच्या टोकापर्यंत लावा. अर्धा-पाऊण तास ठेवा आणि नुसत्या पाण्याने धुवून टाका. रात्री डोक्याला तेल. दुसर्यार दिवशी सकाळी माइल्ड शांपू लावून केस धुवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply