घसा दुखणे ही एक नेहमी आढळणारी तक्रार आहे. खाज सुटल्यासारखे खवखवणे आणि घशात खूप वेदना जाणवणे या दोन टोकांत कमी-जास्त प्रमाणात त्रास होतो. घशातून मेंदूकडे संवेदना नेणाऱ्या मज्जातंतूच्या शिरा (नववी आणि दहावी क्रेनियल नर्व्ह) याच कानातूनही संवेदना मेंदूत नेतात. त्यामुळे घशाच्या आजारात अनेकदा कानही दुखवतो आहे, अशी रुग्णाला भावना येते. जिवाणू अगर विषाणूजन्य दाह, इजा होणे, ऍलर्जी, घशाचा कॅन्सर, शरीराचे काही अन्य आजार, शस्त्रक्रिया किंवा तपासण्यानंतर घसा दुखतो. तोंड उघडे ठेवून श्वाचस घेतला गेला तर घशाचे अस्तर कोरडे पडते. खूप मोठ्याने बोलण्याने स्वरयंत्रणेवर ताण पडतो. अतिरेकी मद्यपान, नाकाघशातून धूर जाणे किंवा अमोनियासारखा वायू घशात जाणे यामुळेसुद्धा घसा दुखू लागतो. घसा दुखण्याची कारणे अनेक. घसा दुखण्याचे एक नेहमी आढळणारे कारण म्हणजे ऍलर्जिक ऱ्हायनायटिस. हा त्रास विशिष्ट ऋतुमानात अथवा वर्षभर होत राहू शकतो. घसा दुखतो व नाक चोंदते. नाकातून पातळ द्राव वाहतो. नाकाच्या मागून घशात स्राव उतरतो. झटके आल्याप्रमाणे शिंकांच्या एकामागोमाग फैरी येतात. वास येत नाही. कपाळ व कानशिलांच्या वरचा भाग दुखू लागतो. डोळे, नाक व घसा येथे खाज सुटते. डोळे लाल होतात. पापण्या सुजतात. हा आजार फुलांच्या परागांना, बुरशीच्या गोलकांना, धुळीला, प्राण्यांच्या त्वचेवरील खवल्यांना झालेल्या ऍलर्जीमुळे होतो. ऍलर्जीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करून त्यावर उपचार करता येतो; परंतु, यामुळे सर्वांनाच फायदा होईल असे नाही.
काही औषधांत अँटि-ऍलर्जिक रेणू असतात, त्यांनी गॅस्ट्रो इसोफेजियल टीफ्क्ललस डिसीझ या विकारात अन्ननलिका आणि जठर यांतील झडप कमजोर होते. परिणामी जठरातील पाचकरस अन्ननलिकेतून घशापर्यंत येतात. या पाचक रसात हायड्रोक्लोजरिक ऍसिडचे प्रमाण बरेच असते. स्वरयंत्रणेचा दाह होतो. आवाज बसतो. अशा व्यक्तींमध्ये स्वरयंत्रणेवरील कूर्चाही सुजणे आणि रुग्णाला आपल्या घशात “गाठ‘ असण्याची भावना येऊ लागते. ग्लॉसोफॅटिंजियल न्यूरालनिया या आजारात घशाच्या एकाच बाजूला चमक आल्यासारखी किंवा कापल्यासारखी वेदना येते. सहसा गिळताना किंवा जांभई देताना हा त्रास अधिक तीव्रतेने जाणवतो. ही वेदना कानापर्यंत जाणवू शकते. हर्पीन सिंप्लेक्सा नावाच्या विषाणूने सहसा नाक व वरचा ओठ येथे फोड येतात (ज्वर उतणे). हा विषाणू कधी कधी घशातही फोड निर्माण करतो. जीभ, घसा, हिरड्या यावर श्वासाला दुर्गंधी सुटते. लाळ खूप येऊ लागते. भूक लागत नाही. अंगात बराच ताप भरतो. इन्फ्लुएंझाच्या आजाराची सुरवात घसा दुखण्याने होते. इन्फेक्शहस मोनोन्यूक्लीीओसिस या आजारात घसा दुखतो. मानेत गाठी येतात. ताप जात-येत राहतो. एपस्टाईत बार नावाच्या विषाणूने तो येतो. आजारी व्यक्तीच्या लाळेतून हा विषाणू परिसरात पसरतो. प्लीहा वाढते. वाढलेली प्लीहा ठिसूळ असते. तुलनेने क्षुल्लक मार लागल्याने ही वाढलेली प्लीहा फुटते व प्राणघातक रक्तस्राव होतो. जिभेच्या, घशाच्या, स्वरयंत्रणेच्या कॅन्सरमुळेदेखील घसा दुखतो. घसा दुखतो अशी तक्रार असणाऱ्या प्रत्येक रुग्णाची काळजीपूर्वक कसोशीने तपासणी होणे आवश्येक आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- सकाळ / डॉ. ह. वि. सरदेसाई
Leave a Reply