देशात महिला किती सुरक्षित आहेत याची जाणीव दिल्ली बलात्काराच्या घटनेनंतर सर्व स्त्रियांना झाली. कुटुंबासाठी अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांना रात्री-अपरात्री नोकरीवरून घरी यायचे असेल तर अशा परिस्थितीत त्यांनी काय करायचे? घाबरून घरी बसणे म्हणजे पळपुटे लक्षण समजण्यात येईल आणि गुन्हेगारांच्या गुन्ह्यात वाढ होईल आणि त्यांचे मनोधैर्य वाढेल. त्यावर ठाण्यात चिल्ड्रन टेक सेंटरच्या विद्यार्थ्यांकडून इलेट्रोनिक ग्यॅझेट तयार करण्यात यश आले आहे. तो उपक्रम चालवणारे पुरषोत्तम पाचपांडे यांना रोबोटिक चप्पल तयार करण्याची कल्पना सुचली.
सध्याच्या काळात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण बघता ठाण्यातील सातवी व नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक “रोबोटिक चप्पल” बनविली आहे की जी तिला छेड काढण्याऱ्या गुन्हेगाराला चांगलाच वठणीवर आणता येईल. काही स्त्रिया चप्पलेचा वापर रोड रोमिओनी त्यांच्याशी फार सलगी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना वठणीवर आणण्यासाठी करत असतात पण ठाण्याच्या या चार विद्यार्थ्यांनी बनविलेली रोबोटिक चप्पल गुन्हेगारांना वठणीवर आण्याचे काम करणारच आहे पण अजून काही वेगळी कामेही करणार आहे.
पुरषोत्तम पाचपांडे यांची ही कल्पना असली तरी ठाण्यातील ए.के.जोशी शाळेच्या सिद्धार्थ वाणी, चिन्मय मराठे, चिन्मय जाधव व शांभवी जोशी या विद्यार्थ्यांनी ही अनोखी चप्पल तयार केली आहे. स्त्रियांच्या सुरक्षेचा विचार करून तयार केलेल्या चप्पलेचे तंत्रज्ञान हे रेडिओ फ्रिक्वेन्सी डिव्हाईच्या साह्याने विकसित करण्यात आले आहे. त्यात सुरक्षेसाठी स्त्रियांच्या पर्समध्ये एक ४ इंच बाय ५ इंच लांबी-रुंदीचा पेटीच्या आकाराचा सायरनचा ब्लॅकबॉक्स असेल आणि तो पूर्ण वॉटरफ्रुफही आहे. या बॉक्स मधील जीपीएस यंत्रणा ही पोलिसांना सहाय्यभूत ठरणार आहे. या चप्पलेच्या दोन्ही टाचांच्या खाली मॅग्नेटिक फिल्ड स्वीचचा वापर केला आहे. स्त्रिया संकटात असतांना त्या चप्पला दोन वेळा पायातील चप्पलेसकट जमिनीवर पाय आपटला किंवा दोन्ही चपलेच्या मागील भाग एकमेकांन जवळ आणला की त्यातील इलेक्ट्रोनिक सर्किट कार्यान्वित होऊन चपलांना लावलेल्या तळातील खिळ्यातून शॉक निर्माण होतो आणि तो त्या गुन्हेगारास लावल्यास त्याला झटका बसेल त्याचे चित्त विचलित होईल आणि याच संधीचा फायदा घेऊन गुन्हेगारास लोटून तेथून आपला जीव स्त्री वाचवू शकेल किंवा पळून जाईल. या चप्पलेचे अजून एक वैशिष्ट असे की स्त्रीच्या पर्समधील वायरलेस सायरनही या गॅझेटद्वारे चालू होतो. सायरनच्या ब्लूटूथच्या सहाय्याने स्त्रीने आधीच आपल्या विश्वासातील पाच नंबरशी जोडलेल्या नंबरावर त्यांना संदेश/सूचना देण्यात येईल की जेणे करून ती स्त्री संकटात आहे. तसेच ही घटना कोणत्या भागात घडत आहे याचा पता एसएमएसद्वारे या पाच नंबरवर कळवळा जातो. या हायटेक चप्पलची किंमत सध्या रुपये २००० आहे. अजून तरी विद्यार्थ्यांनी याच्या पेटंटची मागणी केली नाही. मात्र या विद्यार्थ्यांनी तयार केलेले गॅझेट नक्कीच महिलांच्या सुरेक्षेच्या दृष्टीने उपयोगात येऊ शकते यात शंकाच नाही.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply