नवीन लेखन...

चला करू स्वातंत्र दिन Meaningful

नुकताच आपण ऑगस्ट 2015 रोजी भारत 69 वा स्वातंत्र दिन साजरा केला. स्वातंत्र मग ते कशाचेही मिळो आपण ते नेहमीच एनजाॅय करतो. मी आहारतज्ञ असल्याने मला असे वाटते की ह्या स्वातंत्र दिन पासून आपण रोगांपासून फ्रीडम (Freedom from Illness – Lifestyle Diseases) एनजाॅय करू या. आजार दोन प्रकारचे असतात – कम्यूनिकेबल आणि नाॅन कम्यूनिकेबल. सध्या प्रौढांमध्ये आणि लहान मुलांमध्ये सुद्धा लाईफ स्टाईल डिसीजेस (जीवनशैली रोग) वाढताना दिसत आहे. मुले ही आपल्या देशाचं भविष्य असल्याने मुलांच्या आरोग्या विषयी काळजी घेणे अत्यंत मोलाचे ठरेल.

लाईफ स्टाईल डिसीजेस म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना?
लाईफ स्टाईल डिसीजेस हे नाॅन कम्यूनिकेबल डिसीजेस म्हणून ही ओळखले जातात. व्यक्तीची स्वत:ची अशी जगण्याची एक जीवनशैली असते. अशा काही जीवनशैली असतात की त्यामुळे त्या व्यक्तीच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो किंवा एखाद्या रोगाचा त्रास होऊ शकतो. आहारात, जीवनशैलीत बदल केल्यास वाढलेला धोका कमी होऊ शकतो अशा रोगांना नाॅन कम्यूनिकेबल डिसीजेस म्हणून संबोधले जाते. लठ्ठपणा, टाईप 2 डायबेटिस, कॅन्सर, हायपरटेंशन, स्ट्रोक, ह्रदय रोग, COPD, आणि Atherosclerosis ह्या रोगांना लाईफ स्टाईल डिसीजेस म्हणून संबोधले जाते.

हे रोग बरे करण्यासाठी पैशाचा अपव्यय तर होतोच पण ह्या रोगामुळे होणारी “Disability adjusted life years” पण जास्त असते आणि ही 44 ते 59 ह्या वयोगटात जास्त प्रमाणात दिसते. तसेच ह्या आजारामुळे प्रेझेंटीझम आणि अॅबसेंटीझम वाढताना दिसत आहे. ह्या आजारांचे ओझे किती जास्त आहे हे खालील आकडेवारी वरून लक्षात येईल.

• साधारणतः 40% हाॅस्पीटल मध्ये दाखल केलेले रूग्ण,आणि 35% आऊट पेशंट्स व्हिजिट ह्या लाईफ स्टाईल डिसीजेस साठी आढळतात
• भारतीय व्यक्तींमध्ये रोगाचे निदान लहान वयातच होते – डायबेटिस 51 व्या वर्षी तर US मधे 58 व्या वर्षी; स्ट्रोक ने बाधीत झालेल्या 8 पैकी 1 व्यक्ती 40 वर्षा खालील आढळते; ह्रदय रोगाचा आस 50 वर्षा एवजी 20-30 वर्षातच दिसू लागला आहे; 40 वर्षा वरील रूग्णांचे प्रमाण 10% वरून 35 – 40% पर्यंत वाढले आहे.

स्image-1त्रीया आणि मुख्यत्वे कामावर जाणार्या स्त्रिया ही अशा आजारांमधे मागे नाहीत असे सर्वेक्षणा वरून आढळले आहे. Associate Chember of Commerce and Industry (ASSOCHAM) ह्यांनी गेल्या वर्षी कामावर जाणार्या स्त्रियांच्या आरोग्याची तपासणी केली तेव्हा त्यांना

• 32 – 58 ह्या वयोगटातील स्त्रियांमध्ये आरोग्याची समस्या जास्त आढळल्या
• 4 पैकी 3 स्त्रियांमध्ये आरोग्याच्या काही ना काही तक्रारी असल्याचे निष्पन्न झाले.
• 78% स्त्रियांमध्ये लठ्ठपणा, डिप्रेशन, डायबेटिस, हाय कोलेस्टरॉल, ह्रदय रोग आणि किडनीच्या समस्या आढळल्या
• 42% स्त्रीया लाईफ स्टाईल डिसीजेस मुळे त्रस्त होत्या तर 22% स्त्रियांना क्रॉनिक आजार होते.

हे वाढणारे ओझे कमी करायचे असल्यास आपण सर्वांनाच हेल्दी प्रॅक्टीस आणि मुख्यत्वे करून योग्य आहार, दररोज व्यायाम आणि कामाच्या ठिकाणी वेलनेस प्रोग्रॅमचे आयोजन करावे लागेल. प्री डायबेटिस, प्री हायपरटेंशन असलेल्या व्यक्ती आणि लठ्ठ लहान मुले व तरूण पिढी ह्यांची विशेष करून काळजी घ्यावी लागेल म्हणजे आपोआपच ओझे कमी होण्यास मदत होईल.

प्रीहाइपरटेंशन – ब्लडप्रेशर नाॅर्मल पेक्षा जास्त पण हायपरटेंशनच्या रेंज पेक्षा कमी

प्री डायबेटिस – नाॅर्मल साखरे पेक्षा जास्त पण डायबेटीक व्हॅल्यू पेक्षा कमी जर आपण प्रीव्हेंटीव प्रॅक्टीस अंगीकारली तर

image-2 होणार्या त्रासा पासून मुक्ती
• आयुष्याची कालमर्यादा तर वाढतेच पण आरोग्यदायी वयोमान ही वाढ होते.
• हाॅस्पीटल मध्ये भरती होणे, अचानक मृत्यू येणे, आणि रोगांपासून होणारे त्रास कमी होतात किंवा टाळता ही येऊ शकतात
• औषधांवरील खर्चावर नियंत्रण येते. प्रयोग असे दाखवतात कि रोग टाळण्यासाठीच्या उपाययोजने वर फक्त 1/3 पर्यंतचा खर्च होतो तसेच उपाय योजना उशीरा सुरू केल्यास खर्चात 10% – 20% वाढ होऊ शकते.
• 60% पर्यंत डायबेटिस व ह्रदय रोगाचा आस कमी होऊ शकतो
• ह्रदय रोगामुळे होणार्या मृत्यू मध्ये वर्षाला फक्त 1% घट झाली तर 2030 साला पर्यंत 87% पर्यंत पर कॉपीटा इनकम मध्ये वाढ होईल ह्या वरून हेच सिद्ध होते की आपण आजपासून प्रीव्हेंटीव प्रॅक्टीस सूरू केली तर लाईफ

स्टाईल डिसीजेस पासून फ्रीडम मिळवणे सहज शक्य होईल.

Avatar
About डॉ. शीतल म्हामुणकर 20 Articles
डॉक्टर शीतल म्हामुणकर ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आहेत. त्या या क्षेत्रात ३० हून अधिक वर्षे कायरत असून क्रिडापटूंसाठी आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच काम केले आहे. डॉ. म्हामुणकर या प्रिव्हेंटा क्लिनिक या संस्थेच्या संचालिका आहेत. आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..