किती कप चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे ?
अनेकांच्या दिवसाची सुरवात कपभर चहाने होते. आरोग्यासाठी प्रमाणात चहा पिणे फायदेशीर आहे. त्यामुळे आरोग्य सुधारायला मदत होते. त्यामध्ये गवती चहा, चक्रफूल असे मसाल्याचे पदार्थ मिसळून आस्वाद आणि आरोग्यदायी फायदेदेखील वाढवता येतात. पण केवळ दिवसातील दोन कप चहाने शरीराला आवश्यक फायदे होतात का ? तसेच दिवसातून नेमका किती कप चहा पिणे योग्य आहे अशा सार्याफ प्रश्नांना आहारतज्ञ प्रिया काथपाल यांनी दिलेली उत्तरं नक्की पहा. वजन घटवण्यासाठी किती आणि कसा प्याल ‘ग्रीन टी’ हे देखील अवश्य जाणून घ्या.
दिवसाला 3-4 कप चहा पिणेच आरोग्यदायी आहे. युनिव्हरसिटी ऑफ मेरीलॅंड मेडीकल सेंटरच्या जर्नलमधील अहवालानुसार 4 कप चहातून शरीराला आवश्यक कम्पाऊंड्स मिळतात. मात्र त्याहून अधिक चहा पिणे शरीराला त्रासदायक ठरू शकतो.
कॅफीनच्या सेवनाचा तुम्हांला त्रास होत असल्यास छातीत जळ्जळ होणे, मन अस्वस्थ्य होणे, चिडचिड होणे, हृद्याचे ठोके वाढणे, निद्रानाश होणे, सतत गोंधळ होण्याची शक्यता वाढते.
चहाच्या अतिसेवनामुळे डीहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो.
चहा अतिप्रमाणात प्यायल्यास युरीनमधून कॅल्शियम निघून गेल्याने हाडं ठिसूळ होतात.
चहातील टॅनिनिस घटक फॉलिक अॅ्सिड शोषून घेण्याची क्षमता कमी करतात. यामुळे बर्थ डिफेक्ट्स होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे बाळाचा विचार करत असाल तर चहाने सेवन नियंत्रणात ठेवा.
चहामुळे शरीरात आयर्न शोषून घेण्याची क्षमतादेखील कमी होते. त्यामुळे जेवताना चहा पिणे किंवा जेवणानंतर लगेचच चहा पिणे टाळा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply