एक लक्षात ठेवा……
चांगुलपणा कधीच वाया जात नसतो…..
त्याच फळ देव कधीतरी आपल्याला देतोच.
आपण कोणाला केलेली छोटी किंवा मोठी मदत,
कोणाला दिलेला आर्थिक स्वरुपात मदतीचा हातभार,
रोज एखाद्या झाडाला नियमितपणे घातलेले पाणी,
वाढदिवस व लग्नांचा अवाढव्य खर्च वाचवुन कधी भुकेल्या माणसांना पोटभर जेवण देणे..
स्वताःच पक्षांकरिता व रस्त्यावरील बेघर जनावरांना नियमितपणे अन्न व पाण्याची सोय करणे….
गरीब विद्यार्थाला दिलेला शाळेय शिक्षणासाठीचा योग्य वा आर्थिकदृष्ट्या आधार….
अपंग व्यक्तिस व वयोवृध्दांना घाईगडबडीच्या वेळी मानसन्मानाने आपल्या गाडीतुन दिलेली लिफ्ट….
घरातील न लागणारे जुने सामान, वस्तु आणि जुने कपडे हे सर्व एखाद्या गरजु कुटुंबाला पुन्हा वापराला देणे ….
असे बारीकसारीक गोष्टीसुध्दा स्वमनाला भरपुर आनंद देऊन जातातच …… आणि हो,
ही अशी काम बाकीचे करत नाहीत तर मीच का करावे अस आपण म्हणत बसायचे नाही, कारण चांगली कामे करायला कोणतीच जात पात, धर्म, राजकारण, सामाजिक विषमता, स्त्री, पुरुष, शहाणा, अडाणी, गरीबश्रीमंत असा कोणताच भेदभाव मध्ये येत नसतोच…..
आपण आपल चांगल काम चालुच ठेवायच… ईतरांच त्यांच्यापाशी….. फक्त आपल्यातला “चांगुलपणा” कमी होऊ द्यायचा नाही…. हे लक्षात ठेव…..”….अस माझी आजी मला लहानपणी सांगत होती.
माझ्यातर लक्षात आहेच..
जमल्यास तुम्हीपण लक्षात ठेवा….
— विवेक जोशी
Leave a Reply