१ काळी बायको (वात्रटिका)
काळी तिरळी बायको लाभून,
मिळाले खूप समाधान.
कसे काय बुआ ? असे विचाराल
तर तिच्याकडे कुणी बघत नाही म्हणून
२ सारेच चोर (वात्रटिका)
हासतात तुला वेड्या ते,
पकडला गेलास समजून
परि सहानूभूती आहे त्यांच्यात,
चोर आहेस म्हणून
३ माझी नोकरी (वात्रटिका)
नकार देत होती माझ्या प्रेमाला,
बघून, मी आहे एक बेकार
जळत होते, जळत होते
तिच्या विणा माझे शरीर
सर्व शांत झाले आता,
फायर ब्रिगेड नोकरी मिळता
४ गर्दी पांगवीण्याची कला (वात्रटिका)
गर्दी गर्दी गर्दी,
सर्वत्र त्रस्त करून टाकणारी गर्दी.
गर्दीला पांगविण्याची,
कला मला सापडली
वही घेवून
संग्रहातील कविता मी वाचू ला
५ सिनेमाला चला (वात्रटिका)
नको जाणे सिनेमाला,
गर्दीचा आहे पहिलाच दिवस
याच विचाराने थिएटर पडले ओस
चला जावू सिनेमाला,
आजच्या दिवशी शेवटी.
निराशली मंडळी,
बघूनी हाऊस फूल पाटी
६ असंबधता (वात्रटिका)
त्याला तपासण्यासाठी,
नेले मेंटल हॉस्पीटलला
की तो आजकाल असंबद्ध बोलू लागला
पण डॉक्टर संतापून म्हणाले
तुम्हाला त्याची समज असावी,
की तो आहे एक ‘नवकवी’
७ चिठ्ठीवरला मजकूर (वात्रटिका)
टेबलावर ठेवले होते
बॉसने काहीतरी लिहून
हाताखालच्या लोकांनी
निरनिराळे अर्थ काढले त्यातून
कुणास काहीच समजेना,
म्हणून असिस्टटने केली विचारणा
चिठ्ठी वाचून बॉस म्हणाले
मला काय म्हणावयाच होत तेव्हा,
समजत नाही आता,
ती आहे एक नवकविता
८ मॉर्डन तरूण (वात्रटिका)
अगदी मॉर्डन कॉलेज कुमारांचे
बसले एक टोळके गाडीत समोर
हासत होते, खिदळत होते,
गप्पा मारीत होते,
ऐकण्यासारखे होते
परंतु सांगण्यासारखे नव्हते.
स्टेशन येताच सारे उतरले
तेव्हा मी एकास विचारले
“आपल नाव सांगता ?”
उतरता उतरता ऐकू आले
“ मी आहे मिस निता ”
९ एक सुंदरी (वात्रटिका)
बस मधून चाललो होतो मी,
शेजारी होती जागा रिकामी
येवून बसली जवळ एक सुंदर,
चंचल तरूण बालीका
तिला बघून मनाची खुलली कलीका
तरीही मी एका क्षणांत
माझी जागा बदलली बरका
कारण ती हासत मुरकत म्हणाली
“ थोडस, सरकत का तिकडे काका ? ”
१० चिंगीचे ज्ञान (वात्रटिका)
बाई शिकवी चिंगीला ‘त’ ला काना ‘ता’
चिंगीचे सामान्य ज्ञान तीक्ष्ण,
म्हणते कशी ‘तांबीतला ता’ न बाई
११ बाबाची आई
एक होती म्हातारी,
ती सर्वांना धारेवर धरी
उपास तापास नी सोवळ ओवळ
त्रस्त केल तीन घर सगळ
तिच्यापुढे चालेना कुणाच काही
कारण ती बाबांची होती आई.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
Leave a Reply