एकदाच तिने माझ्या भेदक या नजरेला नजर दिली माझ्याकडे पहात गालात लाल गोड हसली ….
कित्येक दिवसानंतर हृदयातही हिरवी पालवी फुटली बरयाच महिन्यानंतर एक प्रेम कविताही सुचली ………
अंगातही नवीनच एक अनोळखी उर्जा संचारली जीवनातील ध्येयास नवीन दिशा सापडली ………
जगण्यात हरवलेली मजा जणू पुन्हा एकदा गवसली माझ्या गालावर या पुन्हा एकदा खळी फुलली ……..
माझ्या आजारावर ती कदाचित मला औषध वाटली बंद पडलेल्या माझ्या शरिराची चावीच ठरली ……
कवी निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply