चिकुनगुनियाचा ताप हा डेंगीच्या तापाप्रमाणे असला तरीही त्याची मुदत मात्र काही महिन्यांची असते. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात या तापाने अनेकांना जेरीस आणले. गर्भवती महिलांमध्येही या तापाची लागण होण्याची शक्यता असते. हा ताप बरा झाला तरी त्याचे दुष्परिणाम काही काळाने पुन्हा दिसू शकतात..
चिकुनगुनिया हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप (CHIKV) विषाणूंमुळे होतो. हा आजार जडला की दिवस आणि आठवडेच नव्हे तर काही महिन्यांपर्यंत तो रुग्णाची पाठ सोडत नाही. चिकनगुनियाची लक्षणे जरी डेंग्यूसारखी असली तरीही haemorragic fever ची अवस्था मात्र या रोगात जवळजवळ कधीच दिसत नाही.
लक्षणे:
ताप येणे, तोंड, पाठ, पोट येथे पुरळ उठणे ही चिकुनगुनियाची लक्षणे आहेत. या रोगाचा संसर्ग झाल्यास सांधे प्रचंड दुखतात. त्यामुळे रुग्णांना हालचाल करताना त्रास होतो, सांध्यांना सूज येते. रोग बरा झाला, तरी ही लक्षणे कमी होण्यास काही आठवडे लागतात. काही रुग्णांमध्ये दीर्घ संधिवाताची लक्षणे दिसतात. स्नायू, कंबर, डोके दुखण्याची लक्षणेही आढळून येतात. चिकुनगुनियाचा डास चावला की सुमारे १२ दिवस त्याची सर्वसाधारण लक्षणे दिसत नाहीत. मात्र, अनेकदा सांधेदुखी जाणवते. याचबरोबर पहिल्या १२ दिवसांत डोळ्यात लाली आणि प्रखर उजेडाकडे बघण्यास त्रास जाणवू शकतो.
हात-पायांवर रॅशेस येतात. मात्र, चिकनगुनियाचे निदान करण्याचा खात्रीदायक मार्ग म्हणजे रक्ताच्या नमुन्याची चाचणी. सर्वसाधारण तीव्र ताप आणि सांधेदुखी एकत्र आली की तात्काळ ही चाचणी करून घेण्यास सांगितली जाते. आरटी-पीसीआर नेस्टेड प्राईम ही रक्तचाचणी यासाठी घेतली जाते. यामध्ये या विषाणूमुळे रक्तातील काही घटकांचे विघटन होऊन त्याच्या गुठळ्या बनल्याचे आढळतात आणि चिकुनगुनियाचे निदान होते.
आजाराचे परिणाम
तरुण रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती अधिक असल्याने ५ ते ८ दिवसात हा आजार बरा होतो मध्यमवयीन रुग्णांमध्ये २-३ महिने या आजाराचा त्रास होऊ शकतो तर वृद्धत्वाकडे झुकलेल्यांना वर्षभर या आजाराच्या दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते.
तातडीने रक्तनिदान करुन घेणे.
डॅाक्टरांनी दिलेल्या औषधांचा कोर्स पथ्यांसह पूर्ण करणे
आजाराची लागण पुन्हा होऊ नये म्हणून पहिली दोन वर्षे दर सहा महिन्यांनी रक्ततपासणी करणे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply