नवीन लेखन...

चित्रपट निर्माते, लेखक, संपादक विजय आनंद

विजय आनंद यांना गोल्डी म्हणून सुद्धा ओळखले जायचे. त्यांचा जन्म २२ जानेवारी १९३४ रोजी झाला. १९५४ साली दिल्ली येथे अखिल भारतीय महाविद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये एक नाटक करण्यात आले. नाटकाचे दिग्दर्शन करणारी आणि नाटकामध्ये दिग्दर्शकाची भूमिका करणारी व्यक्ती एकच होती. दोन्हींसाठी पहिले पारितोषिक पटकावणारे मा.विजय आनंद हे देव आनंद आणि चेतन आनंद यांचे लहान भाऊ. मुंबईत आल्यानंतर विजय आनंद यांनी देवआनंद याच्या नवकेतन या चित्रपट निर्मिती संस्थेतून नौ दो ग्यारह पासून ज्वेलथीफपर्यंत पडद्याच्या मागची भूमिका साकारली. नंतर त्यांना अभिनयाची ओढ वाटू लागली. काला बाजारमध्ये विजय आनंद यांचा चेहरा पडद्यावर दिसला होता. परंतु तेरे मेरे सपने या चित्रपटातून विजय आनंद यांनी अभिनयाकडे गांभीर्याने पाहायला सुरूवात केली. चोर-चोर, कोरा-कागज, डबलक्रॉस आणि मैं तुलसी तेसे आंगनकी इतके चित्रपट केल्यानंतर अभिनय ही आपल्याला जमणारी गोष्ट नाही हे त्यांच्या लक्षात आले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी (१९५४) देव आनंदच्या टॅक्सी ड्रायव्हरसाठी पटकथा लिहून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार्‍या मा.विजय आनंदने दिग्दिर्शित केलेला पहिला चित्रपट हा नौ दो ग्यारह. देव आनंद आणि कल्पना कार्तिकच्या भूमिका असलेल्या या रहस्यपटानंतर त्याने काला बाझार (१९६०) मध्ये नोकरी मिळवण्यात आणि मिळालेली टिकवण्यात अपयशी ठरलेल्या, आणि मग वाममार्गाला लागलेल्या तरूणाची कथा सादर केली. यात त्याने एक छोटीशी पाहुण्या कलाकाराची भूमिकाही केली होती (नायिकेचा भूतपूर्व प्रियकर). या चित्रपटात एका गाण्याच्या आधी एक अप्रतीम दृश्य आहे. नायक देव आनंद वाममार्गाने भरपूर पैसे कमावतो आणि एके दिवशी आई-बहिणीसाठी कपडे आणि दागिने घेउन घरी येतो. जिना चढताना त्याला ठेच लागते, सगळे दागिने वगैरे वस्तू इतस्ततः पडतात आणि त्याच वेळी सुरु झालेल्या भजनातल्या ‘ना मै धन चाहूं, ना रतन चाहूं’ या शब्दांनी सदसदविवेकबुद्धी जागृत असलेला नायक एकदम चपापतो.

विजय आनंद यांना सस्पेन्स सिनेमांचा बादशाह समजले जायचे. त्याचे ‘तिसरी मंझिल’, ‘काला पानी’, ‘ज्वेल थीफ’ हे रहस्यमय सिनेमे आज इतक्या वर्षांनंतरही वारंवार पाहिले जातात, त्यातलं रहस्य माहिती असूनही!

चित्रपट्सृष्टीतील अनेक कलावंतांप्रमाणे विजय आनंदही काही काळ सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष होते. पण त्याने केलेल्या अनेक सूचना आणि नाविन्यपूर्ण कल्पना धुडकावल्या गेल्यावर गोल्डीने बाणेदारपणा दाखवत पदाचा राजीनामा दिला. विजय आनंद यांचे २३ फेब्रुवारी २००४ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..