मी एक चित्र काढले होते माझ्या भविष्याचे…
त्यात रंग ही भरणार होतो मनासारखे…
पण ते चित्र नियतीने फाडले…
मग मी चित्रच काढणे सोडले…
रंग सारे माझ्यासाठी बेरंग झाले…
आता फाटलेले चित्र जोडायचे आहे…
पण कोणाला ? ज्यांनी ते फाडले आहे…
आता ते चित्र जोडून काय कामाचे…
ते चित्रही आता भूतकाळ झाले आहे…
माझ्या भविष्याचे चित्र आता फक्त तिच्या हातात आहे …
कवी – निलेश बामणे
Leave a Reply