साहित्य:
दोन वाट्या मैदा
चिमूटभर मीठ
तूप
दूध
तांदळाची पिठी
वाटीभर साखरेचा पक्का पाक
कृती:
मैदा, चिमूटभर मीठ घेऊन दुधात घट्ट भिजवा. दीड दोन तास ठेवा. मग खूप कुटून घ्या. त्याच्या लाडवाएवढ्या गोळ्या करा. त्या लाटा. व त्यावर तांदूळ पिठी पेरत जा. एका भांड्यात तूप कोमट करा. ते या लाटलेल्या पोळीवर पसरवा. त्यावर अशीच केलेली दुसरी पोळी उलटी घाला. याची घडी घाला. पुन्हा लाटा. ही पोळी थोडी जाडसर ठेवा. त्याची चौकोनी वळकटी करा. याचे आडवे, चौकोनी तुकडे कापा. ते थोडे लाटा. गरम तूप असताना, आच मंद करुन त्यात हे चिरोटे सोडा. तळा. झार्याने आजूबाजूचे तूप यावर घालत राहा. फुगल्यावर बाहेर काढा. हे चिरोटे थंड झाले की मध्ये थोडे फोडा व त्यात थोडा पाक घाला.

पाक बनवण्याची कृती:
दोन वाट्या साखर व एक वाटी पाणी घ्या. मंद आचेवर ठेवा. ढवळत रहा. व उकळत ठेवा. पाकावर बुडबडे येतील. एका बशीत पाणी घ्या. त्यात हा उकळणारा पाक थोडासा घालून बघा. जर गोळी बनली तर पाक झाला असे समजायचे. थंड झाल्यावर हा पाक चिरोट्यात वर सांगितल्याप्रमाणे घाला.
— नेहा कामथे
Leave a Reply