दमदाटी करून चीनने आपल्याला बॉर्डर डिफेन्स कोऑपरेशन करारावर सही करावयास लावली.चीनने भारतीयाना व्हिसा नाकारायचा आणि भारताने मात्र चिनी नागरिकांसाठी पायघड्या घालायच्या हे भारतासाठी लज्जास्पद आहे. चिनी बनावटीची शस्त्रे मोठ्या प्रमाणात ईशान्य भारतातील बंडखोरांना दिली जात आहेत.मागच्या आठवड्यात चिनच्या सरकारी मुखपत्रात एक लेख प्रसिध झाला. या प्रमाणॆ पुढच्या काही वरषात चिन ६ मोठ्या लढाया लढू शकतो.त्यामधे एक लढाई भारताशी अरुणाचल प्रदेश करता होईल. आपण तयार असावे.
छोटी राष्ट्रे पण चिन विरोधी
चिनशी सिमाविवाद असणारे बाकीचे देश चिनशी कसे वागतात?चीनने पीत सागर, पूर्व व दक्षिण चीन सागर हे आपले क्षेत्र असल्याचे घोषित केले आहे. चीनच्या या घोषणेला भीक घालण्यास त्या भागातील छोटी राष्ट्रे पण तयार नाहीत. या सागरातील स्पार्टले व अन्य बेटांवर तसेच तेल क्षेत्रांवरही चीन एकतफीर् अधिकार सांगत आहे, पण त्याला फिलिपीन्स, व्हिएतनाम व अन्य आशिआन राष्ट्रांनी हरकत घेतली आहे.
ऑस्ट्रेलियातील कॉझर्वेटिव्ह नेते टोनी ऍबर्ट यांचे भारताशी मैत्रीचे घनिष्ठ नाते आहे. ऑस्ट्रेलियाला तीन वर्गातील देश महत्त्वाचे व जवळचे आहेत. पहिले शेजारी देश, दुसरे उत्तम व्यापारी संबंध असणारे, तिसरे व्यूहात्मक सहकारी म्हणून जवळचे ठरणारे देश. या तीनही वर्गात भारत बसतो.आपण ऑस्ट्रेलियाला पण आपल्या आघाडीत सामिल केले पाहीजे.
भारताचा एक मित्र मंगोलिया
चीन विरूध्द आघाडीमध्ये भारताचा एक मित्र आहे मंगोलिया. 30 लाख लोकसंख्या असणारे हे राष्ट्र चीनचे एक शेजारी राष्ट्र आहे. चीन आणि रशियाच्या मध्ये अडकलेल्या या देशाला समुद्रकिनारा नाही, यामुळे या देशाची अर्थव्यवस्था प्रचंड प्रमाणात चीनवर अवलंबून आहे. पण यामुळेच या देशाला चीनची भीती वाटते कारण मंगोलियाकडे प्रचंड प्रमाणात खनिज पदार्थांचा साठा आहे व चीन मंगोलियाचे पदार्थ मातीमोलाच्या किंमतीत विकत घेतो. भारताने या देशाला आरोग्य, शिक्षण आणि इतर क्षेत्रात मदत करायला हवी, जेणेकरुन आपल्याला मंगोलियाकडून खनिज पदार्थ स्वस्त किमतीत विकत घेता येतील.
चीनला रोखण्यासाठी फिलीपीन्सची मदत
आतापर्यंत चीन विरूद्धच्या आघाडी मध्ये फिलीपीन्स या द्वीप समुहचा विसर पडलेला आहे. सध्या आशिया खंडात फिलीपीन्सची आर्थिक प्रगति चीन च्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामुळे पुढच्या काही वर्षात फिलीपीन्स जगात आर्थिक ताकदीत 13 व्या क्रमांकावर येऊ शकतो. सामरिक आणि भौगोलिकदृष्टया फिलीपीन्स हे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी स्थित आहे. चीनच्या साउथ चायना चे सगळे सागरी मार्ग फिलीपीन्स आडवू शकते. जेणेकरून चीनला सुद्धा त्याची झळ बसते. दुसर्या महायुद्धात या सागरी क्षेत्रात अनेक महत्वाच्या लढाया लढल्या गेल्या. त्यानंतरच्या शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेचा सर्वांत मोठा नौदलाचा तळ फिलिपीन्स च्या सुबिक बे मध्ये होता. पण 1990 च्या दशकानंतर हा नौदल तळ तेथून काढण्यात आला.
सध्या चीन आणि फिलिपीन्स मध्ये सागरी सीमाविवाद सुरू झाला आहे. सप्टेंबरच्या दुसर्या आठवड्यात दोन महत्वाच्या घटना घडल्या. चीनने साउथ चायना सी मधील बेटांवर मालकी हक्काचा दावा केला होता. चीनची इच्छा होती की फिलीपीन्सच्या राष्ट्रपतींच्या चीन दौर्यावर फिलीपीन्सने युनायटेड नेशन्स मध्ये चीन विरूद्ध आरबिट्रेशन केस दाखल केली होती. आधी त्यांनी ही केस परत घ्यावी. यामुळे चीनला न घाबरता फिलीपीन्स नी उलट त्याच्या राष्ट्रपतीचा दौराच रद्द केला आणि पुढे जाऊन त्यांनी अमेरिकेचे डिफेन्स सेक्रेटरी चीफ हेगेलना फिलीपीन्सला बोलावले, चिनी नौदलाच्या आक्रमक हालचालींना शह देण्यास अमेरिकेचे नौदल पुन्हा फिलीपीन्समध्ये कार्यरत झाले. फिलीपीन्स हे निव्वळ अमेरिकेवर अवलंबून नाही. त्यांनी दुसर्या आशियाई देशाशी सुद्धा लष्करी संबंध वाढवले आहेत. जपानची मदत घेऊन फिलीपीन्सने आपले नौदलाची ताकद वाढवण्यास सुरूवात केली आहे. विएटनामचे संरक्षण मंत्री सुद्धा फिलीपीन्स मध्ये पोह्चले. विएतनाम व फिलीपीन्स चे संरक्षण संबंध वाढणार आहेत. फिलीपीन्स भारताशी सुद्धा आपले संबंध वाढवू इच्छितो. भारताने याचा फायदा घेऊन चीनची आर्थिक घुसखोरी व लष्करी कुरघोडी विरूद्ध शह देण्यास फिलीपीन्स पुढे केलेल्या मैत्रीचा हाताचा त्वरित फायदा घ्यावा.
चीनच्या ‘एन्सर्कलमेंट’ला वेळीच प्रत्युत्तर
मालदीवमध्ये चीन पाणबुड्यांचाही एक तळ तयार करू पाहतोय. चीनच्या ‘स्ट्रिंग ऑफ र्पल्स’ या धोरणाचाच तो भाग आहे. या धोरणानुसार, पाकिस्तानातील बलुचिस्तानात ग्वादर बंदर, म्यानमारमध्ये कोको आयलंड व सितवे बंदर, श्रीलंकेत हंबनटोटा बंदर, बांगलादेशात चितगाव ही बंदरे चीनने आपले हितसंबंध जपण्यासाठी विकसित केली आहेत.
त्यामुळे चीनच्या ‘एन्सर्कलमेंट’ला भारताने वेळीच प्रत्युत्तर दिले पाहिजे. मालदीव, मादागास्कर, तसेच सेशेल्सबरोबर असलेल्या संबंधात वाढ करणे, मलेशिया, जपान, तैवान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया यांच्याशी विशेष संबंध प्रस्थापित करणे यांसारख्या उपाययोजना भारत करू शकतो. चीनभोवती भारतानेही आपला विळखा मजबूत करणे गरजेचे आहे. हा महासागर ‘इंडियन ओशन’ म्हणून ओळखला जातो; ‘चायना ओशन’ म्हणून नव्हे. आपणही सदैव डोळ्यांत तेल घालून हिंदी महासागरावरचं आपले राष्ट्रहित जपायला हवं.
भारताचे दक्षिण चीन उपसागराबद्दल काय धोरण असावे? भारताचा चीनबरोबर आधीच सीमावाद आहे; त्यात आपल्या देशापासून दूर असलेल्या प्रदेशात का म्हणून उगीचच वाद वाढवावा? चीनशी मैत्री ठेवली तरच आपण अधिक प्रगती करू शकू का?. चीनशी आपल्याला अनेक स्तरावर लढाई करावी लागेल. जर चीन आपल्या शेजारी येउन आपल्याला त्रास देउ शकतो तर आपण पण ही लढाई आपण साउथ चायना सीमधे नेली पाहिजे.
आपण काय करावे
बाकी देशापैकी भारताची कुरापत काढणे सोपे, असे चीनला वाटते. हा समज भ्रामक आहे, याची जाणीव करून देण्यासाठी तरी भारताने धैर्य दाखविले पाहिजे. आपण चीनच्या लष्करी सामर्थ्यावर अंतराळातून, आकाशातून, जमिनीवरून, समुद्रातून आणि सायबर स्पेस मधून लक्ष ठेवले पाहिजे. यामध्ये आपल्याला अमेरिका व चीनच्या शत्रूंची मदत घेता येईल. पाकीस्तान,चीन आणि आपल्या सीमांमधील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला अनेक उपग्रह, युएव्ही, एरोस्टट रडार हवे आहेत. चीनचे शत्रू हे आपले मित्र आहेत. म्हणून आपण जपान, व्हिएतनाम, तैवान, फिलीपिन्स, ऑस्ट्रेलिया, मंगोलिया यांच्याशी सामरिक संबंध आणि लष्करी सहकार्य वाढवले पाहिजे. जेणेकरून चिनी सैन्याला वेगवेगळ्या आघाड्यावर लक्ष द्यावे लागेल.
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
Leave a Reply