मुलांप्रमाणेच मोठ्या माणसांमध्येही जंत होऊ शकतात. त्यांच्यावर वेळीच इलाज केला पाहिजे. मुळात अस्वच्छता व अशुद्धी यापासून दूर राहायला हवे. जंत झाल्यानंतर त्यांचा नाश करण्यावरच थांबता नये, तर त्यानंतर जंतनाशक औषधे घेऊन त्याचे मुळापासून निर्दालन करायला हवे. तसेच जंत का होतात याच्या कारणांचा शोध घेऊन तीही दूर केली पाहिजेत.
घरच्या घरी करता येण्याजोगे साधे उपचार
रोज सकाळी अर्धा चमचा वावडिंगाचे चूर्ण मधासह घेण्याने जंतांचे त्रास कमी होतात.
जेवणानंतर ताकात बाळंतशोप, बडीशेप, ओवा व हिंग यांचे बारीक चूर्ण टाकून घेण्यानेही जंत कमी होतात.
कारल्याच्या पानांचा रस पिणे, मुळ्याचा रस व मध एकत्र करून घेणे, यामुळे जंत पडण्यास मदत मिळते.
टाकळ्याचे बी चावून खाऊन वरून एरंडेल घेतल्यास जंत पडतात.
ताकामध्ये पळसपापडीचे पाव ते अर्धा चमचा चूर्ण घेतल्यासही जंत कमी होतात.
कडुनिंबाच्या सालीचे चूर्ण व हिंग यांचे मिश्रण मधासह घेण्याने जंतांचा नाश होतो.
डाळिंबाचे साल वाळवून त्याचे चूर्ण करून रोज अर्धा चमचा इतक्या् प्रमाणात घेतले तर जंतांची प्रवृत्ती कमी होते.
शेवग्याच्या शेंगा उत्तम कृमिनाशक असतात. शेंगा उकळून त्या पाण्यात सैंधव मीठ व मिरेपूड टाकून घेण्याने जंत कमी होतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ.मधुरा भिडे
Leave a Reply