नवीन लेखन...

जगप्रसिद्ध खोटारडे !

|| हरि ॐ ||

‘जगप्रसिद्ध चायनीज धमकी’ हा श्री जितेंद्र रांगणकर यांनी दिनांक ८ जुलै, २०१३ च्या दैनिक प्रत्यक्ष मध्ये लिहिलेला अग्रलेख वाचण्यात आला. अग्रलेख नेहमी प्रमाणेच अभ्यासपूर्ण आणि उत्तमच आहे. श्री रांगणकरांच्या मताशी सगळेच वाचक सहमत असतील असे मानतो. अग्रलेखातील शेवटच्या परिच्छेदातील शेवटच्या पाच-सहा ओळीतून भारत सरकारला काय संदेश द्यायचा आहे ते त्यांनी नेमके ओळखले आहे आणि ते (१००%) टक्के खरे आहे.

अनपेक्षितरित्या भारतावर १९६२ साली चीनने आक्रमण केले आणि तेव्हापासून चीन आपल्याला अगदी कठपुतळी प्रमाणे नाचवतो आहे. चीन जसा काश्मीरवरील भारताचा अधिकार अमान्य करतो तसे अरुणाचल प्रेदेशाचेही आहे कारण जो नकाशा चीनने प्रसिद्ध केला होता त्यात अरुणाचल प्रदेश चीनमध्ये दाखवण्यात आला होता आणि त्यावर बरीच चर्चा आणि वादंग झाले.

चीनच्या दुटप्पी वागण्याची, राजकारणी मंडळीच्या खोडसाळ वक्तव्याची आणि प्रेमाच्या कारनाम्यांची दखल जगातील सर्वच मिडीयाने घेतली आहे. वातावरण सतत तापवीत ठेवण्याचे आणि मग सारवासारव करण्याचे धोरण यासाठीच राबविले जाते कारण त्यात छुपा आर्थिक हेतू लपलेला असतो त्यांना भारताची बाजारपेठ आकर्षित करत असते. मनी आणि मसल पॉवरने भारताला चांगले घेरायचे आणि चेकमेट करयाची अशी रणनीती आहे. याही आधी दैनिक प्रत्यक्षमध्ये लेख, अग्रलेख आणि बऱ्याच वाचकांची वयक्तिक मते वाचण्यात आली. सगळ्यांचा चीनच्या खोडसाळ वागण्याचा आणि कृतीचा राग मनात दाटून येत होता पण…..! असो.

स्वातंत्र्यानंतरची काही दशके स्थिरस्थावर होण्यात गेली परंतू आपल्या लोकशाही व्यवस्थेचा कणा आणि अभिमान असलेल्या देशात नंतरची बरीच वर्षे गोंधळलेल्या, हरवलेल्या आणि खंबीर नेतृत्व हरवून बसलेल्या वातावरणातून आपण सर्व जात आहोत आणि त्याला पुढील कारणे आहेत:-

१) देशात हजाराहून अधिक अधिकृत राजकीय पक्ष,
२) केंद्र आणि राज्यात अनेक पक्षांचे राज्य,
३) पक्षापक्षातील हेवेदावे,
४) सत्तेसाठी आपापसात तीव्र स्पर्धा,
५) वाढती अमर्याद लोकसंख्या,
६) भ्रष्टाचार,
७) केंद्र व राज्य यांचे अयोग्य नियोजन आणि समन्वय,
८) केंद्र आणि राज्यातील पक्षांचे भिन्न विचार आणि कुरघोड्या,
९) केंद्र आणि राज्यांना निधीचा अभाव,
१०) वेळेत न होऊ शकलेले पूर्वेकडील राज्यातील प्रकल्प,
११) केंद्राचे चुकलेले परराष्ट्रीय धोरण,
१२) निर्णय घेण्यात अक्षम्य दिरंगाई,
१३) स्वत:च्याच पोळीवर तूप ओढून घेणारे राजकीय पक्ष किंवा नेतृत्व,
१४) केंद्रातील राजकारण्यांत इच्छाशक्तीचा अभाव,
१५) देशाच्या तिन्ही दलांत सशाश्त्र आणि आधुनिकीकरणाचा अभाव,
१६) खंबीर नैतृत्वाचा अभाव,
१७) जर भारतात तयार होणार्‍या वस्तू आपण विकत घेतल्या आणि चायनीजला नाही म्हंटल तर बराच फरक पडेल.

२१ व्या शकतील फार मोठी शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचा दावा करणाऱ्या भारताला याबाबतीत आत्मविश्वासाची कमतरता आणि दुबळेपणाची व अशक्तपणाची जाणीव का होते? भविष्यात सर्वच बाबतीत महासत्ताक होण्याची स्वप्ने बघत असतांना अशा गोंधळलेल्या आणि शेजारील राष्ट्रांवर कुठल्याही प्रकारचा धाक नसलेला देश कसा मोठी शक्ती म्हणून उदयाला येईल याचे आत्मपरीक्षण करण्याची आणि इच्छाशक्ती वाढविण्याची सक्ती राजकारण्यांवर करण्याची वेळ आली आहे. यापुढे चीनचे असे लाड पुरवत बसलो तर ड्रॅगन एक दिवस आपल्या नरडीचा घोट घेईल आणि त्यावेळी उशीर झालेला असेल! वरील काही मुद्यांचा विचार करता देशातील जनतेनेही येणाऱ्या सर्वच निवडणुकीत घरी न बसता (१००%) जास्तीत जास्त मतदान केलं तर काही मुद्दे यातून आपोआप निघून जातील. भारताचा विजय असो!

जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..