उदयशंकर चौधरी ऊर्फ उदयशंकर मुळचे नाराली गावचे. त्यांचे वडिल जमीनदार होते. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९०० रोजी राजस्थान मधील उदयपुर येथे झाला.हारचौधरी ही त्यांना पदवी होती. पुढे चौधरी हेच रुढ झाले. त्यांचे वडिल संस्कृतचे पंडित होते. त्यांना तीन लहान भावंड होती. राजेंद्रशंकर, देवेंद्रशंकर, भुपेंद्रशंकर व रवीशंकर. पैकी रवीशंकर हे पुढे जगप्रसिद्ध सतार वादक झाले. मा.१९१८ साली शिक्षणा साठी मुंबई जेजे स्कुल ऑफ आर्ट्स येथे प्रवेश घेतला.पुढे गंधर्व महाविद्यालयातही शिक्षण घेतले. १९२० साली लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ आर्ट्स येथे प्रवेश घेतला .
तीथे भारतीय नृत्य व पाश्चात्य नृत्य यांचा सखोल अभ्यास करुन दोन्हीचे फ्युजन केले.
१९३१ साली पँरीस येथे Indian Dance Academy ची स्थापना केली.
जानेवारी १९३३ ला ते अमेरिकेत गेले. न्युयॉर्क मधे पहिला शो झाला. त्या नंतर अमेरिकेतील ८४ शहरात त्यांचे शो झाले. १९६२ साली ‘ संगीत नाटक अकादमी ‘ चा पुरस्कार त्यांना मिळाला. १९६५ साली कोलकाता येथे त्यांनी Udayshankar center for dance या संस्थेची स्थापना केली. १९७१ साली भारताच्या सरकारने त्यांना पद्मविभुषणने सन्माननीत केले. संपुर्ण युरोप, अमेरिका ,रशिया सह जगातील अनेक देशात त्यांचे नृत्याचे कार्यक्रम झाले.
त्यांना दोन अपत्य ,आनंदशंकर व ममताशंकर.
आनंदने न्रत्यातच आपले करियर केले. तर ममताने अभिनयात आपला ठसा ऊमटवला.
सत्यजीत रे, मृणाल सेन सारख्या दिग्दर्शका सोबत काम केले. ममताने हॉलीवुड चित्रपटात बालकलाकार म्हणुन काम केले.
बहुदा ती पहिली भारतीय, हॉलीवुड चित्रपटात काम करणारी कलाकार असावी.
उदयशंकर यांच्या कलेने भारतीय न्रुत्य जगभर प्रसिद्ध झाले. उदयशंकर यांचे निधन २६ सप्टेंबर १९७७ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply