जन्मापूर्वी चाऱ्याची योजना
योजना करी चाऱ्याची, मुख देण्याचे आधी,
तुझ्या दयेची किमया, कळली न कुणा कधीं….१,
बदल करूनी शरिरी, मातृत्वाचे भरतो रंग,
क्षिराचा देई साठा, पुलकित करूनी अंग…२,
सदैव तयार राहूनी, दाना देई भूमाता,
कुणी न उपाशी राही, काळजी घेई विधाता….३,
जन्म देवूनी साऱ्यांना, पोषण तोच करितो
अनंत उपकार करूनी, ऋणी आम्हा ठेवतो…४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply