पप्पा बोले ना, मम्मी बोले ना
बेबी खंत करी, कोणी काही बोले ना
गेली पप्पांच्या जवळी
म्हटली गोडगोड गाणी
त्यांच्या गळ्यात पडुनी ती रडली
गेली मम्मीच्या जवळी
रागे खवळली मम्मी
रागासवे पळाले प्रेमभाव ग
ये मम्मी या पप्पा
नाचू गाऊ मारु गप्पा
खेळू लपाछपी अन् खेळू झिम्मा
आपल्या बंगल्याचे हे अंगण
नाही कोणाचे हो बंधन
खेळू मुक्त आपण तिघेजण हो
जन द्वेषाने बघती
त्यांची नजर वाड्यावरती
आपण करु शुध्द रस पान हो
मम्मी पप्पा गहले
बेबी जवळी बैसले
गट्टी जमून सारे ते नाचले.
— सौ. सुधा नांदेडकर
Leave a Reply