नवीन लेखन...

जरा आजूबाजूला बघायला शिका!



बायबलमध्ये एक बोधकथा आहे. येशू ख्रिस्त फिरत-फिरत एका गावात आले. त्यावेळी त्यांना दिसले की गावातील सगळेच लोकं एका मैदानात जमले आहेत. प्रत्येकाच्या हातात दगड आहे आणि मैदानाच्या मध्यभागी एका खांबाला बांधलेल्या स्त्रीला ते दगडांनी ठेचून मारणार आहेत. त्या स्त्रीचा अपराध कोणता, याची चौकशी केल्यावर येशू ख्रिस्तांना

सांगण्यात आले की, ही स्त्री व्यभिचारी आहे आणि या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तिला दगडांनी ठेचून मारण्यात येणार आहे. येशू ख्रिस्तांना त्या स्त्रीची दया आली किंवा त्यापेक्षा अधिक गावकर्‍यांच्या बुध्दीची कीव वाटली. पहिला दगड त्या स्त्रीकडे भिरकावल्या जाण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने उपस्थित जमावाला उद्देशून म्हटले की, या स्त्रीला शिक्षा केली पाहिजे हे मान्य, परंतु ही शिक्षा देण्याचा अधिकार केवळ त्याच व्यक्तीला आहे, ज्याने एखादेही पाफत्य केलेले नाही. येशु ख्रिस्तांच्या या आवाहनाने उपस्थित जमाव अंतर्मुख झाला आणि प्रत्येकाच्या हातातील दगड गळून पडला. ही घटना किंवा कथा बोधप्रद असली तरी त्यातील बोध त्या घटनेपुरताच प्रासंगिक ठरला. पापी, अन्यायी किंवा कर्तुत्वहीन लोकांनी स्वत:लाच न्यायाच्या उच्चासनावर बसवून इतरांकडे दगड भिरकावण्याचा अधिकार बाळगणारी मानसिकता आजही विद्यमान आहे. ती स्त्री त्यावेळी भाग्यवान ठरली, परंतु असे भाग्य त्यानंतर कुणाच्या वाट्याला आले नाही. अनेक कर्तुत्ववान माणसं जमावाच्या या मानसिकतेची वेळोवेळी बळी ठरलीत. आजही हे दृश्य सर्रास दिसून येते. समाजाच्या, देशाच्या हितासाठी झटणाऱ्या लोकांची या देशात कमतरता नाही, परंतु कर्तुत्वशून्य मंडळींनी अशा लोकांचे पंख छाटण्याचे कार्य केले आणि समाज किंवा देश बेगडी नेतृत्वाच्या हाती पडला. चांगले लोक राजकारणात येत नाहीत, अशी तक्रार स्वत:ला चांगले समजणाऱ्या लोकांची
सते. परंतु जेव्हा खरोखर चांगली माणसं समाजकारण, राजकारणात आपले कर्तुत्व सिध्द करु पाहतात तेव्हा त्यांच्या नशिबी काय येते? स्वत:मध्ये कुवत नाही आणि ज्यांची कुवत आहे त्यांचा उत्कर्ष, त्यांचे

नेतृत्व सहन होत नाही, अशी विचित्र पोटदुखी जडलेल्या समाजाचे, देशाचे शेवटी काय होणार? एका रात्रीतून कोणी नेता होत नसतो. नेतृत्व हळूहळू फुलत असते, अशा विकसित होऊ पाहणाऱ्या नेतृत्वाला खतपाणी घालण्याचे, प्रोत्साहन देण्याचे काम समाजाने करायचे असते. दगडी शिळेला सिंहासन समजून स्वत: त्यावर राजासारख्या बसणाऱ्या धनगराच्या पोराला आर्य चाणक्यांनी बरोबर हेरले. पुढे तोच पोरगा हिंदुस्थानचा चक्रवर्ती सम्राट मौर्य चंद्रगुप्त म्हणून ओळखल्या जाऊ लागला. समाजाची दृष्टी चाणक्यासारखी हवी. परंतु दुर्दैवाने आज समाजाची प्रवृत्ती छिद्रान्वेषी झाली आहे. उमलू पाहणाऱ्या कळीला खुरडण्यातच आपण धन्यता मानत आहोत आणि विशेष म्हणजे असे करताना आपण फार मोठे सामाजिक हिताचे कार्य करीत असल्याचा प्रचंड मोठा गैरसमज बाळगत असतो. जो धावतो तोच अडखळू शकतो किंवा पडू शकतो, किंबहुना त्याचे अडखळणे किंवा पडणेच त्याची धावण्याची क्षमता सिद्ध करीत असते. अशावेळी त्याला हात देऊन सावरण्याची, त्याच्या चुकांना समजून घेत त्याला योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज असते, परंतु नेमक्या ह्याच वेळी ज्यांना स्वत:चे पायच नाहीत असे अपंग लोक त्याच्या पडण्याचे, अडखळण्याचे भांडवल करून त्याची धावण्याची उमेदच संपवितात आणि वर विकासाच्या दौडीत आपण खूप मागे पडलो हो! असा गळा काढायला तयार असतात. समाजाच्या सर्वच क्षेत्रात असे लोकं भरपूर प्रमाणात आढळून येतात. कोणीच काही करु शकत नाही, चांगले सामाजिक किंवा राजकीय नेतृत्व विकसित हेऊच शकत नाही, हा आपण काहीच करु शकत नाही या त्यांच्या न्यूनगंडाचा झालेला विस्तार असतो. आपल्
या परसात फुलं बहरु शकत नाहीत या आत्मवंचनेतून हे लोकं स्वाभाविकपणे दुसऱ्याच्या परसातील फुलांकडून नेतृत्वाच्या सुगंधाची अपेक्षा करतात. अगदी राष्ट्रीय पातळीपासून गावपातळीपर्यंत ही मानसिकता आढळून येते. संपूर्ण देशभर विस्तार असलेल्या काँठोसला नेतृत्वासाठी एकही देशी व्यक्ती मिळू शकत नाही. इटालियन सोनियाच्या चरणी आपली निष्ठा वाहण्यात तमाम काँग्रेसी धन्यता मानतात आणि वाशिमचे मतदार काश्मिरी गुलाम नबीला आपला खासदार म्हणून निवडतात. वर्ध्याचे वसंत साठे, मुंबईचे आंबेडकर अकोल्याच्या जनतेचे प्रतिनिधित्व करतात, नागपूरचे वासनिक पिता-पुत्र बुलडाण्याचे तर आंध्रप्रदेशचे पी.व्ही. नरसिंहराव रामटेकचे प्रतिनिधित्व करतात. दुसऱ्या प्रदेशातले रोपं आपल्या परसात कलम करुन लावायचे आणि आपल्या परसात उगवू पाहणाऱ्या, उमलू पाहणाऱ्या कळ्या खुडायच्या ही मानसिकता कोणत्या परिभाषेत मांडावी? विदर्भ प्रांतात तर ही मानसिकता अधिकच खोलवर रुजली आहे. आपल्या घरात किंमत नसलेल्या अनेकांनी इथे येऊन आपली राजकीय दुकानदारी थाटली आणि मोठे झाले. मोठे झाल्यावर अनेकांनी कृतघ्नपणे इथल्या जनतेचे उपकार विसरुन विकास मात्र त्यांच्याच परिसराचा केला, हे वेगळे सांगायला नको. पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना विदर्भाने मोठे केले. परंतु विकासाच्या उतरंडीत विदर्भाच्या नशिबी शेवटी पायातला दगड बनून राहण्याचेच भाग्य (?) आले. नेतृत्व मग ते राजकीय असो वा सामाजिक, आयात करायचे नसते. असे आयातीत नेतृत्व अगदी अपवादानेच प्रामाणिक असते. कारण त्याची नाळ इथल्या मातीशी जुळलेली नसते, हे इथे कुणी लक्षात घेत नाही. परिणामस्वरूप विकासाचे लोणी आपल्या डोळ्यादेखत पळविल्या जाते आणि आम्ही काहीच करु शकत नाही. हे लोणी पळविणाऱ्या बोक्यांमध्ये विदर्भाचा कुणी नसतो, ज्याला वैदर्भीय जनता आपला सम
त असते तो बोकादेखील लोणी हातात लागल्यावर ‘पश्चिमेकडे’ धूम ठोकतो. या समस्येची व्याप्ती केवळ विदर्भापुरतीच मर्यादित नाही. ही समस्या राष्ट्रव्यापी आहे. विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती, अफाट मनुष्यबळ लाभलेल्या खंडप्राय हिंदुस्थानला विकासाच्या जागतिक क्रमवारीत अगदी खालचे स्थान आहे, याला कारण देखील न्यूनगंडाने पछाडलेली आपली ही मानसिकताच आहे. संदर्भ दिल्लीचा असो वा गल्लीचा, विकासाभिमुख नेतृत्व आम्ही फुलू दिलेच नाही. राजकारण आणि समाजकारण या वेगवेगळ््या बाबी नाहीत. त्या परस्परांशी निगडित आहेत. राजकीय प्रवासाची सुरुवात समाजकारणाचा

उंबरठा ओलांडूनच होत असते. परंतु ‘प्रथमसे माक्षिकापात’ या न्यायाने

आम्ही उंबरठ्यावरच अपशकुन करण्याचे पवित्र (?) कार्य करतो. चुका या कर्तुत्वाच्या परिचायक आहेत, हे विसरुन काही क्षुल्लक चुकांचे भांडवल केल्या जाते. अशा परिस्थितीत विकासाभिमुख नेतृत्व फुलणार तरी कसे? थोडं आजूबाजूला पाहायला शिका. चिमुटभर देशसुध्दा औद्योगिक प्रगतीत, सामाजिक राहणीमानात आपल्याला मागे टाकून खूप पुढे गेलेत त्यामागची कारणं शोधा. एक ठळक कारण तर निश्चितच आपल्याला आढळून येईल. या देशांनी आपले व्यापक हित जोपासताना वेळप्रसंगी किरकोळ किंवा गंभीर चुकांवरही पांघरुण घालीत लायक नेतृत्वाला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. बिल क्लिंटन आपल्या देशात असता तर केव्हाच त्याची वासलात लागली असती, परंतु अमेरिकन संसदेने क्लिंटनच्या राजकीय धोरणाची पाठराखण करताना त्याच्या वैयक्तिक लफड्याकडे साफ दुलर्क्ष केले. विकसित राष्ट्रातील नेते भ्रष्टाचार करीत नाहीत असे नाही, परंतु नेत्यांच्या भ्रष्टाचारापेक्षा राष्ट्राच्या हिताला तिथे अधिक महत्त्व दिले जाते. आमच्याकडे मात्र वेगळी परिस्थिती आहे. आम्हाला अगदी बावनकशी सोने हवे असते आणि त्याचवेळी असे बावनकशी स
ने इथल्या मातीत निपजूच शकत नाही, यावर आमची ठाम श्रध्दा असत. त्याचा परिणाम हा होतो की पितळी चमक असलेले नेतृत्व गल्लीपासून दिल्लीपर्यंत, सहकारापासून सरकारापर्यंत आमच्या नशिबी येते आणि पितळी नेतृत्वाच्या या गर्दीत अस्सल बावनकशी नेतृत्व ‘आम्हाला योग्य नेतृत्वच लाभलं नाही हो!’ असे रडगाणे गाणार्‍या जमावाच्या पायदळी तुडविले जाते.

— प्रकाश पोहरे

As this is a touchy point for many the one page british fans, visitors to the uk are advised in the strongest possible terms to use football’

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..