नवीन लेखन...

जागतिक आरोग्य दिन

७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना ही युनोची एक विशेष शाखा आहे. ७ एप्रिल १९४८ मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेमध्ये जगातील जवळ जवळ १९२ देशांचा सहभागी झाले. लोकांच्या आरोग्यविषयक जास्तीतजास्त समस्यांकडे लक्ष पुरवणे हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे. संघटनेची आरोग्यविषयक कल्पना केवळ रोग व त्यावरिल उपाय यावरच मर्यादित न रहाता त्यामध्ये मानसिक, शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्याचाही विचार केला जातो. जगात सहा ठिकाणी यासंघटनेची कार्यालये आहेत. द्क्षिण अमेरिकेत ब्राझिल, युरोपमध्ये कोपेनहेगेन डेन्मार्क, दक्षिण पूर्व आशियात दिल्ली, अमेरिकेत वॉशिंटन, आशियात इजिप्त, आणि पश्चिमेला फिलिपिन्स अशा सहा ठिकाणी ही कार्यालये आहेत. नविन वैद्यकीय शोधांना मदत पुरविणे, रोग निवारण व रोगनियंत्रण यासाठी वैद्यकीय मदत पुरविणे, लोकांना आरोग्यविषयक सोयीसुविधांबाबत माहिती पुरवणे, लोकांमध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण करणे, इत्यादि कामे या संघटनेमार्फत केली जातात. सात एप्रिल हा संघटनेचा स्थापना दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी एक विषय निवडला जातो; त्यासंदर्भात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चर्चा, परिसंवाद, पथनाट्य, फिल्म्स, प्रसारमध्यमे आदिमार्फत त्याविषयाबाबत लोकांत जागृती निर्माण केली जाते. हे वर्ष हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने मधुमेह वर्ष म्हणून घोषित केलं आहे. येत्या काही वर्षात मधुमेहाचा धोका वाढत चालला आहे. वेळीच जनतेची जागरूकता झाली नाही तर २०३० पर्यंत हा आजार सर्वात मोठा आजार ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मधुमेह होऊच नये किंवा मधुमेह झाल्यावर काळजी कशी घ्यायची याविषयी प्रत्येकाने जनजागृती मोहीम राबवली पाहिजे. मधुमेहाविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवणं गरजेचं आहे. आजार कुठे होतो, कसा होतो, याविषयी आपण काहीच सांगू शकत नाही. त्याला काही स्थळ आणि काळाच्या मर्यादा नाहीत. कित्येकांना तर आपल्याला हा आजार आहे याविषयीही अजिबात माहिती नसते. हा आजार असाच वाढत राहिला तर वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक पातळीवर तो अतिशय खोलवर परिणाम घडवू शकतो. बैठं काम करण्याची जीवनशैली असलेली मंडळी साखर, मीठ आणि चरबीयुक्त पदार्थाचं सेवन करतात अशा लोकांना मधुमेहाचा धोका अधिक असतो. अतिरिक्त वजन आणि व्यायामाचा अभाव यामुळे ९० टक्के लोकांना टाइप २ चा मधुमेह होतो. खरं म्हणजे कोणत्याही प्रकारचा मधुमेह बरा होऊ शकतो. फक्त तो लवकर समजणं गरजेचं आहे. या आजाराचं निदान लवकर झालं नाही तर तो शरीराच्या कोणत्याही मुख्य अवयवाला धोका पोहोचवू शकतो. परिणामी हृदयविकार, स्ट्रोक्स, अंधत्व किंवा चेतासंस्थेला इजा पोहोचू शकते. म्हणूनच हा आजार होऊच नये म्हणून आपण स्वत: काही पावलं उचलणं आवश्यक आहे.

सकस आहार आणि शर्करायुक्त पेय कटाक्षाने टाळणं आवश्यक आहे. तसंच आपल्या अवयवांकडेही लक्ष दिलं पाहिजे. आपण किती खायला घेतो यापेक्षा आपण खातोय ते किती पौष्टिक आहे याकडे लक्ष द्यावं. थोडक्यात आपण सेवन करत असलेल्या पदार्थातून आपल्या शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा आहारातून मिळते की नाही, यावर लक्ष ठेवायला हवं. त्याचप्रमाणे दररोज ३० मिनिटं नियमित चालणं आणि आठवडयातून किमान पाच वेळा तरी वजन वाढणार नाही याकडे लक्ष देणं आवश्यक असतं.

रक्तात साखरेचे प्रमाण वाढले तर काय होते?
मधुमेहामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका अधिकच वाढतो. ५० टक्के मधुमेही रुग्णांच्या मृत्यूचे कारण हे हृदयविकार आणि पक्षाघात आहे. रक्तात वाढलेली साखर आणि कमी झालेला रक्तपुरवठा यामुळे चेतापेशींना इजा होते. त्यामुळे पायांची संवेदना कमी होते. जखमा झाल्यानंतर जंतुसंसर्ग वाढतच जातो आणि प्रसंगी पायदेखील कापावा लागतो. जगातील अंध लोकांपैकी १ टक्के अंधत्व हे मधुमेहाच्या दृष्टिपटलावरील परिणामामुळे होते. मूत्रपिंड निकामी होऊन डायलिसिस करायला लागण्याचेदेखील महत्त्वाचे कारण मधुमेह हे आहे. मधुमेहासाठी लागणाऱ्या उपचारांचा खर्चदेखील बराच जास्त आहे. २०११ मध्ये भारताचा ३८ अब्ज डॉलर्स एवढा खर्च केवळ मधुमेहामुळे झाला. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अहवालानुसार भारतासारख्या विकसनशील देशामध्ये साधारण कुटुंबाचे जवळपास २५ टक्के उत्पन्न फक्त मधुमेहाच्या उपचारांसाठी खर्च होते. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी हे एक मोठे आव्हान आहे.

या मागची कारणे कोणती? मानवाने नेहमीच प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आहे. मग ती आर्थिक, सामाजिक किंवा भौतिक असो. या धावपळीमध्ये काही अपरिहार्य बदल माणसाच्या जीवनशैलीमध्ये झाले. शारीरिक हालचालींचा अभाव, स्निग्ध आणि अतिगोड पदार्थाचे अतिरिक्त सेवन, वरचेवर वाढत चाललेला ताणतणाव, शारीरिक स्थूलता आणि वाढलेली आयुर्मर्यादा यांमुळे मधुमेहाच्या प्रमाणामध्ये अधिकच भर पडत आहे.

पहिल्या प्रकारच्या मधुमेहाची नेमकी कारणे निश्चित नसल्यामुळे त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आव्हानात्मक आहे. पण दुसऱ्या प्रकारचा मधुमेह हा प्रतिबंधात्मक उपायांनी नियंत्रित करता येऊ शकतो. वाढत्या वजनावर नियंत्रण, नियमित योग्य व्यायाम, योग्य वेळी योग्य पोषक आहार, आरोग्यदायी दिनचर्या व निव्र्यसनी जीवनशैली यांमुळे मधुमेहापासून स्वत:चा बचाव करता येतो.

मधुमेह हा आजार आणि त्यामुळे होणाऱ्या गुंतागुंतींची व्यापकता लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षी जागतिक आरोग्य दिनाची मध्यवर्ती कल्पना/बोधवाक्य हे त्याच्याशी निगडित ठेवली आहे. ती म्हणजे ‘उत्कृष्ट राहा; मधुमेहावर मात करा!’ उत्कृष्ट राहा यामध्ये-मधुमेहाचा वाढता प्रभाव थांबवणे, सक्रिय राहणे, आरोग्यदायी खाणे, वैद्यकीय सल्ला पाळणे आणि जर शंका आली तर स्वत:ची तपासणी करून घेणे या सर्व बाबी समाविष्ट आहेत.
येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या संकटावर मात करून अखंडपणे भव्यतेच्या दिशेने वाटचाल करणे हा मानवजातीचा गुणधर्म आहे. या झटपट बदलणाऱ्या काळामध्ये वातावरणात अचानक होणारे बदल, वाढती पाणीटंचाई यांसारख्या समस्यांबरोबरच आरोग्याकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे. असे केले तरच मानवाचा विकास शाश्वततेच्या दिशेने होईल.

मधुमेहाचं त्वरित निदान झाल्यास आणि नियमांचं काटेकोरपणे पालन केल्यास मधुमेहामुळे निर्माण होणा-या समस्यांना आपण ताब्यात ठेवू शकतो.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on जागतिक आरोग्य दिन

  1. Good article.
    By changing life style mostof the diseases can be kept under control.
    There is no need to take any allopathy medicines.All the medicines are available in kitchen “Aahar Hech Aushad ” is a book freely available on internet.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..