नवीन लेखन...

जागतिक चहा दिन (१५ डिसेंबर)

पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा… भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांगला देश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला हे सांगणं कठीण असलं तरी चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळते. जागतिक चहा दिनाच्या निमित्तानं जगभरातील टी आणि कॉफी हाऊसेसमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते.
चहाची कथा
चहाबद्दल असे सांगितले जाते की पाच हजार वर्षांपूर्वी ‘शेननंग’ नावाचा चिनी राजा होऊन गेला. तो प्रयोगशील, दूरदृष्टी असलेला, कलेचा भोक्ता होता. त्या राजाच्या राज्याचा विस्तार खूप मोठा होता. आपल्या राज्यातील दूरच्या ठिकाणी जाऊन प्रजेची हालहवाल विचारावी म्हणून त्याच्या लवाजम्यासकट निघाला. एके ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले. राजाने नोकरांना पाणी उकळण्यास सांगितले. पाणी उकळायला ठेवले त्या वेळेस काही वाळलेली पाने उकळत्या पाण्यात पडली. पाणी करडय़ा रंगाचे झाले. राजा संशोधनवृत्तीचा असल्यामुळे तो ते पाणी प्यायला. त्याला खूप तरतरी आली. हाच जगातील पहिला चहा आहे असे मानले जाते.
जागतिक चहा दिना निमित्ताने
जवळपास सगळ्याच्यांच दिवसाची सुरुवात चहाने होत असते. आपण चहा पितो… मात्र त्याचे काही फायदे आणि उपयोग आहेत, ते कदाचित आपल्याला माहीतही नसतील.
केस चमकदार राहतात.
ग्रीन टीच्या वापराने केस चमकदार बनू शकतात. ग्रीन टीसुद्धा त्याच झाडांपासून बनवली जाते ज्यापासून काळा चहा बनवला जातो. मात्र ग्रीन टी बनवण्याची पद्धत वेगळी असते. ग्रीन टीला ऑक्सिडाइज केलं जात नाही. त्यामुळे पानांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते. ते इलेक्ट्रॉन केसांना चमकवण्यास मदत करतात.
ग्रीन टीचा वापर कसा करावा.
केस चमकदार बनवण्यासाठी, ग्रीन टीची तीन बॅग उकळत्या पाण्यात टाका. पाणी थंड झाल्यावर टी बॅग काढून घ्या आणि त्या पाण्याने केस धुवून घ्या. १० मिनिटानतंर केसांना कंडीशनर लावा. त्यानंतर केसांना येणारी चमक पाहण्यासारखी असते. तुम्ही केसांना गडदसुद्धा करू शकता, त्यासाठी ग्रीन टीऐवजी ब्लॅक टीचा वापर करावा.
जर तुमचे डोळे सुजले असतील तर काळजीचं कारण नाही. वापलेले दोन टी बॅग तुमची समस्या दूर करू शकतात. तणाव, अॅलर्जी, जास्त दारू पिल्याने डोळ्यांना सूज येऊ शकते. मात्र, चहात असलेली कॅफीन सुजलेल्या डोळ्यांच्या नसा आणि स्किनला आराम देतात आणि तुमचे सूजलेले डोळे ठीक होतात. डोळे बंद करून टी बॅग डोळ्यांवर १० मिनिटं ठेवा. त्यानंतर तुम्हाला झालेला बदल जाणवेल.
सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी जेव्हा तुम्ही जास्त वेळ सूर्य प्रकाशात राहता, तेव्हा चेहऱ्यावर काळे डाग येण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी थंड टी बॅ्ग चेहऱ्यावर प्रभावित जागी १० मिनिट ठेवावी. त्यानंतर झालेला बदल तुम्हाला दिसेल. चहाच्या पानांमध्ये आढळणारा टॅनिक अॅसिड गुलाबाच्या फुलाची सुंदरता आणि रंग वाढवण्यास मदत करतो. वापरलेल्या टी बॅग फाडून गुलाबाच्या झाडाच्या मुळाशी पसरवावी. त्याचा परिणाम फुलांवर होऊन फुले अधिक सुंदर होतात. जर तुमची स्किन थोडी कडक असेल तर इंजेक्शन घेण्यापूर्वी इंजेक्शन घेण्याच्या जागी थंड टी बॅग ठेवा. काही वेळाने स्किन मऊ होईल. त्यामुळे इंजेक्शनचा त्रासही होणार नाही आणि कोणतही इन्फेक्शन होण्याची भीतीही राहणार नाही. जर दिवसभर काम करून तुमच्या पायांना दुर्गंधी येत असेल किंवा स्किनची समस्या असेल तर काळजी करण्याची गरज नाही. महाग स्प्रे खरेदी करण्यावर पैसे खर्च करण्याची गरज नाही.
कोमट पाण्यात टी बॅग टाका. पाणी थंड झाल्यावर त्यामध्ये पाय भिजवा. त्यामुळे पायांची दुर्गंधी तर जाईलच, त्याचबरोबर पायदेखील मऊ होतील. चेहऱ्यावरील डाग, मुरूम यांपासून सुटका मिळवण्यासाठी ग्रीन टीचा वापर होऊ शकतो. ग्रीन टी स्किनमध्ये असलेले बेन्जॉईल प्रॉक्साइडला थांबवते, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या येत नाहीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..