भाऊ भाऊ पांड्या अन बंड्या
म्हणती लोक जाड्या अन वेड्या
अभ्यास, व्यायाम, वाचन, खेळ
भंड्या घालवततो शिस्तीत वेळ
जाड्याला सार्यांचा कंटाळा
खाष्या-पिष्याचा फारच लळा
समोसे, वडे, बर्गर, पिझ्झा
खायला वाटते फारच मज्जा
चायनीज अन् पेढे लाडू खातो
टी.व्ही बघत बसून रहातो
डॉक्टरी तपासणी शाळेत झाली
डॉक्टरांनी नंबी जाड्याला दिली
धावणे पळणे व्यायाम कर
तेलकट तुपकट वर्ज्य कर
साधा आहार पाले भाजी फळे
आजार जडतील जाडेपणा मुळे
सल्लयाप्रमाणे नियमीत रहा
लठ्ठपणा जाईल प्रचिती पहा
आई बाब कडक झाले
जाडोबाने मनावर घेतले
कपड्यांचे माप एकच झाले
भावा-भावाचे मेतकूटजमले.
— सौ. सुधा नांदेडकर
Leave a Reply