नवीन लेखन...

“जास्वंदाचा चहाचे गुण”

जास्वंद चहा किंवा हिबीस्कस टी हे पारंपारीक औषध आहे. या चहाचे आपल्या आरोग्यावर सुपरिणाम होऊन शरीर आरोग्यपुर्ण आणि स्वस्थ राहण्यासाठी त्याचे सेवण करणे चांगले आहे.
या चहामध्ये भरपूर अँटीआँक्सिडंट्स असतात. ज्यामुळे रक्तदाब कमी रहातो.
जास्वंदीच्या पाकळ्यांपासुन हा चहा तयार करतात. सुवासिक, काहिशा आंबट, असा हा चहा किती उपकारक, फायदेशीर आहे, ते पहा:-
“यकृताचे संरक्षण”
जास्वंदीचे चहातील अँटीआँक्सिडंट गुणधर्म यकृताच्या आजारांवर फायदेशीर ठरतात. शरीराच्या उती आणि पेशी यांच्यातील फ्री रँडिकल्सला निष्फळ करण्यासाठी अँटीआँक्सिडंट्स मदत करत असल्यानं आपल्या शरीराचे रोगांपासुन संरक्षण होते. हा चहा रोज प्यायल्याने शरीरातील अवयवांचे कार्य सुरळीत सुरू राहून आपले आयुष्यमान वाढते.

“कर्करोगविरोधी”

जास्वंदी चहामध्ये हिबीकस प्रोटोकँटेचुईक अँसिड असते. या अँसिडमध्ये अँटीट्युमर आणि अँटीआँक्सीडंट गुणधर्म असतात. हे अँसिड अवयवाच्या वाढीदरम्यान मृत पावणा-या पेशींसारखेच कर्करोगाच्या पेशीची वाढ थांबवते.

“अँटीबँक्टेरियल”
या चहामध्ये अँस्कोरबिक अँसिड असते. ज्याला सी जीवनसत्व असेही म्हणतात. शरीराच्या प्रतिकारशक्तीला उत्तेजना मिळविण्यासाठी हे आवश्यक आहे. यामध्ये दाह कमी करण्याची आणि जीवाणू निर्मितीला आळा घालणे ता दोन्ही क्षमता आहे. त्यामुळे सर्दी व खोकला होण्यापासुन बचाव होतो. तापामुळे येणारी अस्वस्थताही चहाच्या थंड प्रकृतीमुळे कमी होते.

“पाळीच्या वेदना कमी करते”
पोटात येणा-या कळा आणि पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी यापासुन आराम मिळतो. यामुळे हार्मोन्सचे संतुलनही राखले जाते. त्यामुळे पाळीच्या काळात जाणवणारी स्विंग्ज, औदासीन्य, अतिभूक यांसारखी लक्षणेही कमी होतात.

“अँटिडिप्रेसंट”
याचहामध्ये जीवनसत्व व खनिज यांचे प्रमाण आढळते. फ्लँवोनाईडस् सारख्या अँटिडिप्रेसंट गुणधर्माच्या खनिजांचा साठा आहे. त्यामुळे हा चहा प्यायल्यावर मज्जासंस्था, याच्याबरोबरच शरीर व मन दोन्ही शांत होते.

“पचणास मदत”
या चहामुळे मूत्रप्रवृती आणि शौचप्रवृत्ती सुधारते. या चहामध्ये मूत्र प्रवृत्ती वाढवणारे गुणधर्म असल्याने अपचणाचे तक्रारीते हे वापरले जावे. त्याशिवाय वजन घटविण्यासाठी आपल्या पचनसंस्थेचे आरोग्य वाढविण्यासाठीसुध्दा याचा उपयोग होतो. त्यामुळे आतड्याचा कर्करोग टाळता येऊ शकतो.

तहान भागवते-
याचहामुळे तहान भागत असल्याने खेळाडूसुध्दा हा चहा पितात. चहाच्या या गुणधर्मामुळे हा चहा बर्फाच्या तुकड्यांच्या स्वरूपात वापरला जातो. या चहात औषधी गुणामुळे मूत्रप्रवृत्तीत वाढ होणे, शरीरातील अतिरिक्त पाणी, विषारी द्रव्ये बाहेर टाकून शरीराची आतून स्वच्छता करते. त्यामुळे आरोग्य चांगले राहते…..

“कसा करावा जास्वंदीचा चहा”
*दोन कप पाणी उकळवा. त्यात जास्वंदीचा आणि दालचिनीचा एक-एक तुकडा टाका. वीस मिनीटांसाठी भिजत राहू द्या. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या. हवे असल्यास साखर किंवा संत्रीचा ज्युस घाला. हा चहा गरम किंवा थंड कोणत्याही प्रकारे पिऊ शकता.

विकास दांगट,
धनकवडी, पुणे.
सौजन्य
पुढारी आरोग्य

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..