जीवन हे निर्सगाने दिलेली एक सुंदर देणगी आहे. मानवाची निर्मिती हा एक अदभूत चमत्कार आहे. या जगात प्रत्येक मनुष्य हा खास व महत्वपूर्ण आहे व प्रत्येकाला आनंदाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. या अधिकाराला कोणीही त्याच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.
निसर्गाने मानवाची निर्मिती केली व त्याचा पालनकर्ताही निसर्गच आहे. निसर्गाने मानवाला भरपूर काही दिलं व तो निसर्गाचं देणं लागतो. निसर्गाचे ऋण फेडावे ते कमीच. मनुष्य जगात रिकाम्या हाताने येतो व रिकाम्या हाताने जगाला निरोप देतो. पण मागे ठेऊन जातो त्या त्याच्यासोबत जुळलेल्या त्याच्या आठवणी,त्याचे नातेसंबंध,त्याचे कर्तृत्व, त्याने घडवून आणलेला बदल इत्यादी.जीवन अस्तित्वात आहे तर मृत्यू ही अस्तित्वात आहे. जे आज आहे ते उद्या नाही. प्रत्येक गोष्टीचा अंत हा निश्चित आहे.जीवनातील आनंद हेच एक निरंतर सत्य आहे.
हे जग फार सुंदर आहे.या सुंदर जगाला बघण्यासाठी मानवाला सुंदर डोळे आणि मन ही निसर्गाने दिले आहे.पण ही सुंदरता बघण्याचा प्रयत्न फक्त त्यालाच करायचा आहे.मानवाने स्वतःवर व इतरांवर प्रेम केलं तर जीवनातील आनंदाचा मार्ग नक्कीच सापडू शकतो.शेवटी सुख,शांती व समाधान हेच जीवन जगण्याचे ध्येय असावे.
— प्रा. हितेशकुमार एस. पटले
Leave a Reply