”अरे आमच्या घरी काय कमी आहे . . सांगच तू मला . . काजू बदामाचे डबे भरलेले आहेत . . रोज सलाड , ज्यूस आमच्यात असतातच , फूड च्या बाबतीत कुठंच ‘कॉम्प्रमाइज ‘ करत नाही आम्ही . . . तरी आमच्या अंगी का लागत नाही ?? ”
वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना वरील संवाद नवा नाही . अंगी लागत नाही ही समस्या सर्वत्र आहे . . अनेक रिपोर्ट्स नॉर्मल असतात पण खाल्लेले अंगी मात्र लागत नाही . आता हे अंगी लागणे म्हणजे काय ?? तुम्ही बॅंकेत 1000 रुपये भरले की काही वेळाने तुम्हाला ते 1000 रुपये खात्यात दिसतात . . आपण काय म्हणतो ? पैसे खात्यात जमा झाले . . हाच नियम शरीराला लावा . . तुम्ही खाल्लेले अन्न त्याचे व्यवस्थित पचन झाल्यानंतर तुमच्या शरीरावर दिसते . . लोक सुदृढ दिसतात . . ‘खात्या पित्या घरातला/घरातली दिसत आहे ” हे याच प्रकारातले . . पण खाल्लेले अंगावर दिसतच नसेल तर ?? भरपूर ड्राय फ्रुट्स , ज्यूस , सलाड , कॉर्न फ्लेक्स ह्याव त्याव खाऊन पण गाडी पाप्याचं पितर असेल तर काय करावे ??
ब्लड टेस्ट्स ? सप्लिमेंट्स ?? चीज ? अरे हो . . . थांब जरा !!
शंकराचार्य म्हणतात ” जितं जगत्केन ? मनोहि येन । ” ज्याने आपले मन जिंकले त्याने जग जिंकले . . आपली परिस्थिती उलटी आहे . . आपण जग जिंकतो पण मनाचे काय ?? ते सैराट असते . . . त्यात ना शांतता , ना समाधान , ना स्थैर्य . . . जगभरातील तत्ववेत्त्यांचे विचार डोक्यात असतात पण आचरणात शून्य . . अशा मनस्थितीत जेवण केले तर अंगी कसे लागेल भाऊ ?? आमचे आचार्य चरक म्हणतात –
”प्रसन्न चेतसा भुञ्जीत । ” म्हणजे प्रसन्न मनाने जेवावे . . .
असं होतं का ?? नाही होत . . . . जगाच्या चिंता डोक्यात घेऊन , प्रगती करणाऱ्याला चार शिव्या हासडत , घरातील कलहात डोकं आपटत केलेले जेवण कधीच अंगी लागत नाही . त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी आहारात काय ठेवू ?? हा प्रश्न मला विचारला तर मी सांगेन ” आधी प्रसन्न मन ठेव . . . मग बाकीचे बघू ”
वैयक्तिक अनुभवावरून सांगतो , जेवण करत असताना टीव्ही बंद करून , शास्त्रीय -नाट्य संगीत ते शक्य नसेल तर नामस्मरण इत्यादी केल्याने जेवण केल्याची तृप्ती येते . . ज्या दिवशी हे नाही जमत त्या दिवशी जेवण सुद्धा ‘ जॉब डन ‘ या वर्गात टिक मार्क केल्या सारखे होते . . . तुमचा काय अनुभव ??
वैद्य अंकुर रविकांत देशपांडे
9175338585
आयुर्वेद कोश (https://web.facebook.com/aarogyakosh/ )
(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)
— `आरोग्यदूत’ WhatsApp ग्रुपवरुन
Leave a Reply