नवीन लेखन...

जेवण आणी राशीचे स्वभाव

थोडेसेच जेवण का असेना
मेष आवडीने खाणार..
गरम, चमचमीत पदार्थांवर
यांची पहिली नजर जाणार.. ।।१।।

वृषभेची व्यक्ती दिलखुलास पणे
दाद देऊन जाते..
लोणची-पापडासारखे पदार्थही
अगदी चवीचवीने खाते.. ।।२।।

कधी मारुनी मिटक्या,
कधी नन्नाचा चाले पाढा..
मिथुनाचे कौतुक मधाळ
तर टीका कडवट काढा.. ।।३।।

‘अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हणत
कर्केचे होते पूर्ण जेवण..
रुचकर पण थंड अन्नही हे
कसे पटकन करतात सेवन? ।।४।।

राजस जेवणाच्या सिंहेचा
केवढा राजेशाही थाट..
थोड्याथोड्या सर्वच पदार्थांनी
यांचे भरुन जाते ताट.. ।।५।।

‘कमी-जास्त नाही ना?’
याची उगाच बाळगून भीती..
इतरांकडे पाहून ठरते
कन्येची जेवायची नीती.. ।।६।।

भात-भाजी-आमटीबरोबर
पचतील तेवढ्याच पोळ्या..
अशा संतुलित आहारानंतर
तूळ खाते पाचक गोळ्या.. ।।७।।

काही Missing आहे का
कधी कळतही नाही..
साधे नेहमीचेच जेवण
पण वृश्चिकेला रुचत नाही.. ।।८।।

कधी पटपट-झटपट जेवण
तर कधी अगदीच वेळकाढू..
धनू काढत नाही जेवताना खोड्या
पण वेळ मिळताच संधीसाधू.. ।।९।।

ना कधी कौतुक
ना कसली नकारघंटा..
गपगुमानं जेवतो मकर
करत नाही कधी थट्टा.. ।।१०।।

निश्चित वेळ जेवणाची
पार्टी असो वा एखादे लग्न..
कुंभेची चिकित्सक वृत्ती
नेहमी रेसिपी जाणण्यात मग्न.. ।।११।।

कधी-कुठेही जमते
मीनेची खाण्याशी गट्टी..
पोटभर खाताना घेतात
‘डाएट’ नावाशी कट्टी.. ।।१२।।

आहे ना गंमत !

स्वतःची रास तपासून बघा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..