नवीन लेखन...

जेष्ठ कलाकार नयना आपटे

त्यांची आई शांता आपटे यांची कडक शिस्त, व बाबुराव आपट्यांची करडी नजर या वातावरणात नयना आपटे लहानाच्या मोठ्या झाल्या.त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९५० रोजी झाला.लहानपणापासून अंगभूत कलागुणांना खतपाणी घालत त्यांची निगराणी करत, परिस्थितीशी जुळवून घेत नयना आपटे एक कलाकारी व्यक्तिमत्त्व घेऊन लोकांसमोर आल्या आणि रसिकमान्य झाल्या. वयाच्या पाचव्या वर्षांपासून त्यांनी आईकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. ‘आयुष्यात कुठलाही क्षण वाया जाऊ द्यायचा नाही,’ हे तत्त्व आयुष्यभर अमलात आणलेल्या शांताताईंनी ते छोट्या नयनाच्याही मनात उतरवलं. शिक्षणाबरोबर गाण्याचा रियाज आणि शरीरसौष्ठव जपण्यासाठी पोहणे, बॅडमिंटन, नृत्य इ. क्षेत्रांत त्याना आवड होती. बॅडमिंटन कोर्ट, स्विमिंग पूल अशा सर्व सुखसोयींनी सज्ज असंच घर होतं. त्यामुळे बाहेरच्या जगाशी, वातावरणाशी नयनाचा फारसा संबंधच येत नसे. त्यामुळे मित्र-मैत्रिणीही नव्हत्या.

नयना आपटे यांनी बालकलाकार म्हणून वयाच्या चौथ्या वर्षी मराठी नाटकातून कामं केली. पाचव्या वर्षी ‘पुण्यप्रभाव’ या नाटकात युवराजचं काम केलं. वयाच्या सातव्या वर्षांपासून सलग पाच वर्षं रोहिणी भाटे यांच्याकडे नयना कथकही शिकत असे. त्याच सुमारास सरस्वती बोडसांच्या ‘झाशीची राणी’ या चित्रपटात झाशीच्या राणीचा छोटा मुलगा दामोदर याचं काम तिने केलं. १९५८ साली ‘रणजित स्टुडिओ’चे मालक नानूभाई मिस्त्री यांच्या ‘चंडीपूजा’ या हिंदी चित्रपटातली काम केले. निरुपा रॉय यांच्या या पहिल्या चित्रपटात छोट्या निरुपा रॉयचं काम मा.नयना आपटे यांनी केले होते. २४ फेब्रुवारी १९६४ ला मा.शांता आपट्यांचं दु:खद निधन झालं. आचार्य अत्रे यांच्या सांगण्यावरून शांताताईंच्या पाथिर्वाला अग्नी नयनानेच दिला. वय वर्ष होतं फक्त चौदा. अठरा वर्षं पूर्ण होईपर्यंत तिच्या मालकीचं काहीच होणार नव्हतं. त्यामुळे राहता बंगला, खूप मोठी मालमत्ता याची मालकीण असूनही बंगल्याला सील ठोकण्यात आलं. त्याही स्थितीत एस्.एस्.सी.ला ८४ टक्क्यांनी उत्तीर्ण होण्याची उत्कृष्ट कामगिरी तिने केली होती. आई गेल्यावर ती काही महिने पुण्याला जाऊन राहिली. पण स्वत:च्या पायांवर उभं राहाण्याची जिद्द, अभिनय, महाविद्यालयीन शिक्षण, शास्त्रीय संगीताच्या जोरावर त्या पुन्हा मुंबईत परत आल्या. अशातच १९६५ मध्ये दत्ता धर्माधिकारींच्या ‘दैवे लागला चिंतामणी’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९६७ साली ‘अंमलदार’ या मराठी नाटकात राजा गोसावींबरोबर नायिका रंगवल्यावर नयना आपटेंची पुढे १५ वर्षं राजा गोसावींबरोबर जोडी जमली. साठ विनोदी नाटकांतून या जोडीने कामं केली. या नाट्यप्रवासात त्यांना चित्तरंजन कोल्हटकर, शशिकांत निकते, अरविंद देशपांडे, दाजी भाटवडेकर, दामू केंकरे यांच्याकडून गद्य नाटकातील भूमिकांमधले बारकावे अभ्यासता आले. मा.नयना आपटे यांनी आजवर ६५ मराठी नाटकांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. गुजराथी नाटकांमधूनही त्यांच्या भूमिका खूप गाजल्या आहेत. ‘मिली’, ‘चुपके चुपके’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी कामे केली आहेत. सहा गुजराथी चित्रपट, दूरदर्शनवरील हिंदी-मराठी मिळून १६ मालिका त्यांच्या नावांवर आहेत. एवढी कामगिरी बजावूनसुद्धा त्या कधीच थकल्या नाही. महाराष्ट्राची शान ठरलेल्या संगीत रंगभूमीसाठी कोणी नुसता आवाज दिला तरी मी माझी सर्व कामे बाजूला ठेवून तिच्या सेवेला हजर राहीन, असं म्हणणा-या नयना आपटेंचा उत्साह आजही केल्यानंतरही तितकाच अदम्य आहे. तरुणांनाही लाजवणारा आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..