आज ३० नोव्हेंबर
आज जेष्ठ गायीका सुधा मल्होत्रा यांचा वाढदिवस.
जन्म.३० नोव्हेंबर १९३६
लता मंगेशकर व आशा भोसले यांच्या प्रभावाच्या काळात सुद्धा सुधा मल्होत्रा यांनी स्वत:च्या आवाजात वेगळेपणा जपून गायली. सुधा मल्होत्रा यांनी अनेक हिंदी चित्रपट गीते गायली. तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक़ है तुमको (दीदी), कश्ती का खामोश सफर है (गर्ल फ्रेंड – किशोर कुमार यांच्या बरोबर), सलामे हसरत कबूल करलो (बाबर), व मराठीत तर त्यांनी अमराठी असुन ठसा उमटवला. शुक्रतारा मंद वारा (अरुण दाते यांच्या बरोबर) आणि विसरशील खास मला ही गाणी मा.सुधा मल्होत्रानीच गायली आहेत. नंतर ती गाणी अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले यांनी अनुक्रमे ती गायली.
विसरशील खास मला” हे मालकंस रागातील नितांत सुंदर गीत. त्यावेळेस यशवंत देव आकाशवाणीवर संगीतकार म्हणून नोकरीला होते. दोन कार्यक्रमांमधील जागा भरून काढण्यासाठी त्यांना एक गाणे हवे होते. “विसरशील खास मला” हे गीत त्यांनी सुधा मल्होत्रा यांच्याकडून म्हणून घेतले. हे गीत अल्पावधीतच खूपच लोकप्रिय झाले. त्यावेळेस कामात खूप व्यस्थ असलेल्या आशा भोसले यांना हे गीत खूप भावले. त्यानंतर काही वर्षांनी आशा भोसले यांच्या विनंतीवरून यशवंत देव यांनी हे गीत पुन्हा एकदा आशा भोसले यांच्या आवाजात रेकॉर्ड केले. शुक्रतारा मंदवारा हे गाणे जवळ जवळ १०० चे वर सुधा मल्होत्रा शुक्रतारा मंदवारा या कार्यक्रमाच्या निमिताने अरुण दाते यांच्या बरोबर गायल्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply