अलाहाबाद विद्यापीठात अध्यापनशास्त्र आणि इंग्रजी मध्ये एम.ए केले. १९५३ मध्ये नरेंद्र शर्मा यांनी आकाशवाणीत नोकरी सुरु केली. त्यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९१३ रोजी उत्तर प्रदेशतील जहागीरपूर येथे झाला.१९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा ’ऑल इंडिया रेडिओ’ नावाचा स्वतंत्र विभाग माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आला. ’ऑल इंडिया रेडिओ’चे अधिकृतरीत्या ’आकाशवाणी’ हे नाव १९५७ साली ठरविण्यात आले. ते नरेंद्र शर्मा यांनी सुचविले होते. आज जे आपण ‘आकाशवाणी’ नाव ऐकतो ते १९५७ मध्ये नरेंद्र शर्मा यांनी ‘आकाशवाणी’ हे नवे आकर्षक नाव ऑल इंडिया रेडीओला सुचविले. या नावामुळे भारतीय जनता, रसिक श्रोत्यांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण झाली, व लोक रेडिओ ऐकू लागले. १९३१ मध्ये पंडित नरेंद्र शर्मा यांची पहिली कविता ‘चांद’ या मासिकात आली होती. विविध भारतीची सुरुवात २ ऑक्टोबर, १९५७ रोजी झाली. १९५७ साली आकाशवाणीचे तेव्हाचे महानिर्देशक गिरिजाकुमार माथुर यांनी एक असा रेडिओ चालू करण्याची कल्पना मांडली की ज्यात विविधता असावी. त्यामुळे या रेडिओचे नाव विविध भारती पडले. नरेंद्र शर्मा व गोपालदास यांनी त्यांना सहयोग दिले. विविध भारतीवर पहिल्या गाण्याची सुरुवात संगीतकार अनिल विश्वाशस यांनी नरेंद्र शर्मा यांनी लिहिलेल्या गाण्याने झाली. ज्या नरेंद्र शर्मा यांनी ज्योती कलश छलके हे गाणे लिहिले त्याच नरेंद्र शर्मा यांनी सत्यम शिवम सुन्दरम या चित्रपटातील सत्यम शिवम सुन्दरम हे गाणं लिहिले होते. नरेन्द्र शर्मा यांनी लिहिलेलं स्वागतम हे गाणं १९८२ च्या एशियाड मध्ये स्वागत गीत म्हणून निवडलेले होते. याचे संगीत रविशंकर यांनी दिले होते. पं.नरेंद्र शर्मा यांनी लोकमानसात आपले आगळे स्थान निर्माण केले होते. मुंबई टॉकीज आणि देविका राणी युसूफ खान पठाण, (दिलीप कुमार) यांचा ‘ज्वार-भाटा’ चा नायक म्हणून विचार करत होते. तेव्हा नरेश शर्मा यांनी युसूफ खान पठाण हे नाव दिलीप कुमार नाव सुचवले. पं. नरेंद्र शर्मा, यांनी लोकमानसात आपले आगळे स्थान निर्माण केले होते. पंडीत नरेंद्र शर्मा यांना लता मंगेशकर या आपले संगीत गुरू मानत. पंडित नरेंद्र शर्मा यांचे ११ फेब्रुवारी १९८९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
नरेंद्र शर्मा यांची दोन गाणी
स्वागतम शुभ स्वागतम
आनंद मंगल मंगलम
नित प्रियम भारत भारतम
नित्य निरंतरता नवता
मानवता समता ममता
सारथि साथ मनोरथ का
जो अनिवार नहीं थमता
संकल्प अविजित अभिमतम
आनंद मंगल मंगलम
नित प्रियम भारत भारतम
कुसुमित नई कामनाएँ
सुरभित नई साधनाएँ
मैत्री मति कीडांगन में
प्रमुदित बन्धु भावनाएँ
शाश्वत सुविकसित इति शुभम
आनंद मंगल मंगलम
नित प्रियम भारत भारतम
“ज्योति कलश छलके’
ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके
हुए गुलाबी लाल सुनहरे, रंग दल बादल के
ज्योति कलश छलके..
घर आंगन वन उपवन उपवन, करती ज्योति अमृतसे सिंचन
मंगल घट ढलके, मंगल घट ढलके
ज्योति कलश छलके..
अंबर कुंकुम फल बरसाए, फूल पँखुडिया पर मुसकाए
बिंदू तू ही न जलके, बिंदू तू ही न जलके
ज्योति कलश छलके..
पात पात बिरवा हरियाला, धरती का मुख हुआ उजाला
सच सपने कलके, सच सपने कलके
ज्योति कलश छलके..
उषा ने आँचल फैलाया, फैली सुखकी शीतल छाया
नीचे आँचल के, नीचे आँचल के
ज्योति कलश छलके..
ज्योति यशोदा धरती गय्या, नील गगन गोपाल कन्हैया
श्यामल छबि झलके, श्यामल छबि झलके
ज्योति कलश छलके..
Leave a Reply