चार ते पाच बांबूंच्या आधाराने उभारलेल्या आणि आच्छादन म्हणून ङ्गाटके-तुटके ब्लँकेट तसेच गोधड्यांचे छत अशा या चंद्रमौळी झोपडीत पासष्ट वर्षीय वृद्ध, त्याची पत्नी मुलासमवेत कडाक्याच्या थंडीतही उज्वल भविष्य साकारण्यासाठी अहोरात्र कष्ट करीत आहेत.जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा, या संत तुकाराम महाराजांच्या शिकवणुकीचा आज ङ्गारसा विचार होत नाही, ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. नगर जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यालगतच्या एका कोपर्यात बसून येणार्या जाणार्यांचे अतिशय माङ्गक दरात भविष्य वर्तवितानाच पत्नी आणि मुलासह स्वतःच्या उज्वल भविष्य साकारण्यासाठी कष्ट करणार्या या वयोवृद्ध इसमाची कहानी काहीशी विचार करायला भाग पाडणारी आहे. गणपत वाघडकर असे नाव असलेल्या या इसमाची गावाकडे पाच सात एकर बागायती शेती, त्यामध्ये ऊसाचे पिक. मात्र सर्व काही मुलांच्या नावावर करून हे सद्गृहस्थ असे कष्टमय जीवन का व्यतीत करीत आहेेत, हे एक कोडेच आहे. विशेष म्हणजे घरी अठरा विश्व दारिद्रय तरीही ते दारिद्रयरेषेखालील योजनेपासून वंचित, वयाची साठी ओलांडली तरी त्यांना जेष्ठ नागरिकांचे शासकीय लाभ मिळत नाहीत आणि देशाचे नागरिक असून त्यांच्याजवळ शासनाचे ओळखपत्र नाही. संतोष नावाचा मुलगा रेणुकानगरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहे. रात्रभर थंडी आणि डास चावत असल्याने हैराण झालेल्या या संतोषचा अभ्यास कसा होत असणार? नगर शहर आणि जिल्ह्यात अशी एक नव्हे अनेक कुटुंबे हलाखीचे जीवन जगत आहेत. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अशा निराधार कुटुंबांना माया आणि आपुलकीचा आधार देण्याची खरी गरज आहे. नगरचे जिल्हाधिकारी डॉ. अन्बलगन यांनी मध्यंतरी मेंढपाळ तसेच ऊसतोेडणी कामगारांच्या
ुलांना घरपोहोच दाखले देण्याची महत्वांकांक्षी योजना राबविली होती. जिल्ह्यात या योजनेचे मोठे स्वागत करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने शासनातर्ङ्गे अशीच एखादी योजना अशा गरीब, निराधारांसाठी
राबविणे गरजेचे झाले आहे. आपल्या नेत्याच्या
वाढदिवसानिमित्त फ्लेक्स आणि हारतुर्यांवर हजारो रुपयांची उधळण करणारे राजकीय पक्षांच्या तथाकथित निष्ठावान कार्यकर्त्यांनी हा पैसा जर अशा निराधार व्यक्तींसाठी खर्च केला तर त्यांना या व्यक्तींचे कायमचे पुण्य लाभेल. नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येणार्या शक्तीप्रदर्शनामुळे संबंधितांच्या होणार्या तात्कालिक कौतुकापेक्षा कार्यकर्त्यांकडून या निराधारांना मिळणारी प्रेमाची ऊब निश्चितच पुण्यदायी ठरणारी आहे. आपल्या मराठी मुलखात निराधार व्यक्तींची अशी व्यथा पुढारलेल्या समाजरचनेला निश्चितच शोभनीय ठरणारी बाब नाही.माझा मोबाईल- 9767093939
— बाळासाहेब शेटे
Nice