आज ११ नोव्हेंबर.. आज ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा यांचा वाढदिवस
माला सिन्हा यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३६ साली कोलकाता,( बंगाल) येथे झाला.
माला सिन्हा यांचे मूळ नाव एल्डा आहे. रोशनआरा या बंगाली चित्रपटाव्दारे माला सिन्हा यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. गुरुदत्तच्या प्यासा चित्रपटात वहिदा रेहमान असतानाही माला सिन्हा यांनी ‘हम आपकी आखोमें’ या गाण्यातून आपला वेगळा ठसा उमटविला होता. १९५४ ते १९७४ अशा वीस वर्षांत जवळपास ६५ हिंदी चित्रपटांमध्ये अदाकारी करणारी आणि आपल्या मादक अदांनी लाखो सिने रसिकांना घायाळ करणारी नायिका म्हणजे माला सिन्हा. परवरिश या चित्रपटातील माला सिन्हा यांचे सौंदर्य अनेकांना घायाळ करणारे ठरले होते. दिल्लगी, गहरा दाग, गीत, अनपढ, हिमालय की गोद में, गुमराह, दिल तेरा दिवाना, मेरे हुजूर, होली आई रे, संजोग या चित्रपटांमध्ये माला सिन्हा यांनी प्रभावी अभिनय केला. माला सिन्हा ह्यांनी हिंदी बरोबरच बंगाली आणि नेपाळी चित्रपटांतून काम केले आहे. माला सिन्हा यांच्यावर चित्रित झालेली गाणी रसिकांना प्रचंड भावली. ये हरियाली और रास्ता…, धीरे धीरे चल चाँद गगन में… आपकी नजरोने समझा, प्यार के काबिल मुझे… झुमता मौसम मस्त महिना… यांसारख्या एकाहून एका सरस गाण्यांना अभिनेत्री मा.माला सिन्हा यांनी आपल्या अदाकारीने चार चाँद लावले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply