रोहिणी हत्तंगडी एन.एस.डी.मधून १९७४-७५ साली शिकून आल्या. त्यांचा जन्म १० एप्रिल १९५१ रोजी झाला.तिथून आल्यानंतर काही वर्षांनी त्यांना ‘गांधी’ हा सिनेमा मिळाला. त्याच दरम्यान त्यांचे ‘चांगुणा’ हे नाटक सुरू होतं. त्यानंतर चार वर्ष त्या थिएटरच करत होत्या. ‘कस्तुरीमृग’, ‘लपंडाव’ अशी नाटकं केली. ‘रथचक्र’ सुरू असताना १९८१-८२ मध्ये ‘गांधी’ सिनेमात काम केलं. कस्तुरबाची भूमिका केली तेव्हा त्या फक्त २७ वर्षांच्या होत्या. त्यामुळे त्यांना त्या वयात हिंदी सिनेमांमध्ये आईची भूमिका मिळत गेली. तेव्हा थोडंसं वेगळं वाटायचं. याच वेळी त्याची काही नाटकंही चालू होती. काही वर्षांनी सिनेमातल्या गुडी गुडी मदर इमेजला त्या कंटाळल्या होत्या. आता काही तरी नवीन करायला मिळायला हवं असं वाटू लागलं. पण, जे काम येईल त्यामध्ये मी चांगलं काही शोधायचा प्रयत्न करत होते. हे करायचंच नाही, ते नको, असं नको, तसं नको असं कधी काही झालं नाही. पैशांसाठी करूया असा दृष्टिकोन असला तरी त्यातही त्यांना ‘प्रतिघात’, ‘सारांश’ असे सिनेमे मिळत गेले. दरम्यान मराठी नाटकं थांबली. पण, गुजराती थिएटर सुरू झालं. दुसरीकडे आविष्कार सुरू होतंच. तिथेही अनेक नाटकं केली. ‘हम लोग’, ‘बुनियाद’ ‘खानदान’ दूरदर्शनच्या या पहिल्या मालिका. त्यापैकी त्या ‘खानदान’मध्ये होत्या. ‘चार दिवस सासूचे’मधली आशालता आणि ‘होणार सून मी ह्य़ा घरची ’मधली आई आजी लोकप्रिय झाली. जेष्ठ नाट्यकर्मीं जयदेव हत्तंगडी हे मा.रोहिणी हत्तंगडी यांचे पती. रोहिणी हत्तंगडी यांचे चिरंजीव असीम हत्तंगडी हे पण नाट्यकलाकार आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply