निद्रानाश असल्यास पेरू, सफरचंद़ आणि गाजर किंवा बटाट्याचा रस पालक रसाबरोबर सायंकाळच्या पूर्वी घ्यावा.
झोपण्या पूर्वी सोसवेल ईतक्या गरम पाण्यात १०/१५ मिनिटे पाय बुडवून ठेवावेत.
रोज डोक्यास व तळपायास सावकाशपणे एरंडेल तेल चोळून जिरवावे. तळहातावरही ते लावून जिरवावे. तळपाय काशाच्या वाटीने घासावेत, गुण खात्रीने येतो. मात्र या गोष्टीत सातत्य आवश्यक आहे.
गरम दुधात दोन चमचे मध घेऊन झोपावे
गाईचे तूप व जायफळाची पावडर हातापायांना व कपाळावर घासल्याने उष्णता कमी होऊन शांत झोप लागते.
डोके व पाय यांना खोबरेल तेल किंवा गाईचे तूप काशाच्या वाटीने घासावे.
रोज रात्री खुरासनी ओव्याची पावडर चिमुटभर तोंडात टाकून त्यावर भांडेभर पाणी प्यावे त्यामुळे झोप चांगली येते. खुरासनी ओवा काष्टौपधीच्या दुकानात मिळतो. या उपायाने मानेतील आखडलेल्या शिराही मोकळ्या होतात.
शुद्ध माक्याचे ब्राह्मी तेल झोपण्यापूर्वी डोक्याला मालिश करावे
साजूक लोणकडे तूप चमच्यात घेऊन गरम करून झोपताना ३/४ थेंब प्रत्येक नाकपुडीत सोडावे.
नैवेद्याच्या अर्धी वाटी दुधात जेष्टमध उगाळून गंधासारखे दाट करावे व त्यात तितकेच खोबरेल तेल घालून हे तयार केलेले तेल झोपण्यापूर्वी डोक्यास लावावे.
दुधी भोपळ्याचा रस तीळाच्या तेलात मिसळून डोक्यास मसाज करावा.
सॅलड पत्यांचा रस गुलाब तेलात म्सळून कपाळावर चोळल्यास शांत व चांगली झोप येते.
भरपूर दही खावे व डोक्यात चोळावे. ……रात्री मात्र दही खाऊ नये.
दिर्घ श्वसन करावे त्यामुळे देखिल झोप शांत लागते.
वरील सर्व कारणांमुळे झोप लागेल अर्थात वरील सर्व उपाय सर्व प्रकारच्या तब्बेतीच्या लोकांना उपयोगी पडतीलच असे नाही. कारण प्रत्येक औषधाचे परिणाम प्रकृति-प्रकृतीनुसार बदलत असतात. अर्थात वरील पैकी कोणत्यातरी एकाद् दोन उपायांनी गुण निश्चित येईल.
झोप न येणे हे जसे शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने अपायकारक आहे तसेच झोप जास्त येणे हे देखिल अपायकारक आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply