एक मंदिर होत, प्रसिध्द मंदिर होत, त्या मंदिरात अनेक देश विदेशातील लोक यायचे, भक्तगन यायचे. त्यामुळे ते मंदिर खुपच चर्चेचे प्रसिध्दीचे होते. आणि मग काही दिवसांनी त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले. आणि मग ट्रस्टी बदलल्यावर त्यांनी विचार केला आपल्या मंदिरात देश-विदेशातील लोक, भाविक भक्त येतात. त्यामध्ये इंग्रजी बोलणारे भाविक भक्त वैगेरे असतात. तेव्हा आपल्या मंदिरातल्या सगळया लोकांना, कर्मचार्यांना पण इंग्रजी आल पाहिजे. त्यांनी लगेच फरमानच काढला. मंदिरामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलच पाहिजे. कंम्पलसरीच आहे म्हणे….
झाल…..
आता काय,
आता त्या देवळात एक घंटा वाजवणार होता. त्याला हि कंम्पलसरी झाल ना. ते म्हणे मला काय इंग्रजीचा उपयोग आहे? मी का इंग्रजीत घंटा वाजवतो का ? आणि इंग्रजीत वाजविली काय अन मराठीत वाजवली काय, वाजणार घंटाच आहे. म्हणुन मी शिकलो नाही म्हणुन काय होतय… ट्रस्टी म्हणाले नाही, नियम म्हणजे नियम, सगळयांना इंग्रजी आलच पाहिजे.
आता त्या घंटा वाजवणाराच पन्नास-पंच्चावन वय त्याच, तो म्हणाला आता कधी शिकव ? त्याने सरळ ती घंटा वाजवायची नौकरीच सोडली.
बर आता नौकरी सोडली पण पोटापाण्यासाठी काहीतरी केलच पाहिजे. कराव तर काय कराव, मग त्याने विचार केला मंदिर प्रसिध्द आहे देश-विदेशातले भाविक-भक्त येथे येतात आणि मंदिराच्या आसपास कुठ चहा पिवाव तर काही व्यवस्था नाही. मग त्याने काय केले तर सरळ मंदिराच्या बाहेर एक चहाच टपर टाकल. आता मंदिरात अनेक भाविक-भक्त यायला लागले त्यामुळे गर्दी जास्त, जशी गर्दी जास्त तस चहाच टपर जोरात चालल. बघता बघता त्या चहाच्या टपराच त्याने एका छोट हाॅटेल केल. छोट हाॅटेल हि तुफान चालल. मग छोटया हाॅटेलच त्याने मोठ हाॅटेल केल. मोठ हाॅटेल सुध्दा भयानक चालल आणि बघता बघता त्याची तिन चार मोठी हाॅटेल झाली. आणि मग नंतर त्याने फाईव्हस्टार हाॅटेलच काढल. आणि अशा फाईव्ह स्टार हाॅटेलची साखळीच तयार केली. अन त्याच्या या फाईव्ह स्टार हाॅटेल मध्ये देष-विदेषातील भाविक-भक्त यायला लागले. निवासासाठी थांबायला लागले. त्या हाॅटेलच व्यवस्थापण, तिथल नियोजन हे सगळ बघायला लागले.
एका दिवशी त्या हाॅटेलला एक विदेशी शिष्टमंडळ उतरल आणि उतरलेल्या विदेषी शिष्टमंडळाला अस वाटल की या हाॅटेलच नियोजन, व्यवस्थापन इतक उत्तम आहे तेव्हा या हाॅटेलच्या मालकाला भेटाव. आणि त्यांनी त्या मालकाला भेटायची इच्छा व्यक्त केली.
मग हा आला भेटायला. आता ते सगळे इंग्रजीतुन बोलायला लागले अन हा पठठया मराठीतुन बोलायला लागला. मग एकजण म्हणाला अहो, एवढया फाईव्ह स्टार हाॅटेलचे मालक तुम्ही; अन तुम्हाला इंग्रजी येत नाही का ? तुम्ही इंग्रजी शिकला नाहीत का ? तसा हा पठठया म्हणाला इंग्रजी शिकलो असतो तर आत्तापर्यंत देवळात घंटाच वाजवत बसलो असतो……
यशाकडे नेणाऱ्या पुष्कळ वाटा असतात हो, एक दार बंद झाल तर त्या झोळीत दहा दार उघडलेली असतात. तुम्ही एकाच दारावर नका टकरा मारत बसु. आम्ही काय करतो एक दार बंद झाल ना, की तिथच हातपाय गाळुन शांत बसतो. काहीच नाही होणार आता, हा दरवाजा उघडच नाही…
दरवाजा स्वत:हुन नाही उघडणार; तुला उघडावा लागेल.
रस्ता तुझ्यापुढे नाही येणार; तुला स्वत:ला रस्ता निर्माण करावा लागेल नाहीतर शोधावा लागेल.
एक जिवंत नियम आहे-
सांगा म्हणजे कळेल,
मागा म्हणजे मिळेल,
शोधा म्हणजे सापडेल,
आणि ठोठवा म्हणजे उघडेल…
हे करणं ज्याला जमत त्याला यश मिळत…
शोधा म्हणजे सापडेल. दार ठोठवा म्हणजे उघडेल, कारण मागणार्याला मिळतं, शोधणार्याला सापडतं आणि दार वाजवणार्याला दार उघडतं.
Leave a Reply