आज दिनांक ९-११-२००१. आमचे विमान फ्रांकफूर्टच्या विमानतळावरून निघून जवळ जवळ ५ तास ऊलटून गेले होते. नुकत्याच दिल्या गेलेल्या ड्रिंक्स आणि खाण्यामुळे खर तर प्रवासी मंडळी खूप आळसावलेली होतो. आता एखादा मस्तपैकी सिनेमा पहावा, नाहीतर छानपैकी तण्णावून द्यावी अशा विचाराने सारे तयारी करू लागलेले मी अगदी स्पष्ट पाहिले. आम्हा फ़्लाईट अटेंडंटना प्रवासी मंडळींनी असेच करायला हवे असते. कारण बहुतेक प्रवासी बिचारे आपापल्या धंद्यासाठी प्रवास करीत असतात आणि कांही आपल्या नातेवाईकांना भेटायला जात असतात. पण ते कुणीही असले तरी त्यांना हवी तशी विश्रांती मिळणे आवश्यक असते. शिवाय ते असे सुस्तावले की आम्हा विमानांतल्या नोकर वर्गाला ईतर कामे आटपायची असतात त्याला संधी मिळते. ज्यांना आतापर्यंत ’ब्रेक” मिळाला नसेल तो त्यांना घ्यायचा असतो. (होय, आम्ही प्रवासांत असलो तरी ख-या अर्थाने ’कामावर’ असतो नाही का, त्यामुळे नियमांप्रमणे प्रत्येक दोन तासांच्या ऊड्डाणानंतर आम्ही १५ मिनिटांची विश्रांती घेणे हे आवश्यक असते)
[elink]हा संपूर्ण लेख वाचण्यासाठी टिचकी द्या #http://mnbasarkar.blogspot.com[/elink]
— श्री.मा.ना. बासरकर
Leave a Reply