एकाच्या हातात कात्री
दुसऱ्याच्या हातात लेखणी
डॉक्टर आणि समीक्षक
करतात सदा चीरफाड.
डॉक्टरची कात्री
चालते शरीरावर
बहुतेक रोग्यांचे
वाचविते प्राण.
समीक्षकाची लेखणी
चालते कवितेवर
बहुतांश कवींचे
*हरते ती प्राण.
टीप: समीक्षकांच्या, समीक्षेला घाबरून बहुतांश कवी कविता करणे सोडून देतात.
— विवेक पटाईत
Leave a Reply