नवीन लेखन...

डॉ. दाभोलकरांच्या विचारांची हत्या !

रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी – सकाळी टी.व्ही वर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्तेची बातमी पाहून मन सून्न झालं. मी बर्याचदा डॉ. दाभोलकरांना टी. व्ही. वर आपले विचार मांडताना पाहील होत आणि ऐकलही होत ! पण ! कधीही आपले विचार मांडताना मी त्यांच्या चेहर्यावर कोणाबद्दलचाही राग कधीच पाहिला नाही कारण ते आपल्या विचारांशी प्रमाणिक होते. अशा सरळ मार्गी निराअपराधी विचारवंताची हत्या व्हावी हे पुरोगामी महाराष्ट्राच दुदैवच म्ह्णावं लागेल. वैचारिक मतभेद हे काही आजचे नाहीत ते ह्जारो वर्षापूर्वीही होते आणि आणखी हजारो वर्षानंतरही असतील. फक्त त्याचे विषय बदललेले असतील इतकच ! फक्त आपल्या देशातच नाही तर जगाच्या कोणत्याही टोकावर राह्णार्या प्रत्येक मानवास आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. त्याचा तो अधिकार नाकारण्याचा हक्क कोणालाही नाही अगदी परमेश्वरालाही ! फक्त आपल्या विचांरामुळे कोणाची हत्या होत असेल तर ते संपूर्ण मानवजातीचच दुदैव म्हणाव लागेल. एखाद्या विचावंताने कितीही पोटतिडकीने आपले विचार मांडले तरी त्या विचारांचा स्विकार करायचा की नाही हे लोकांच्याच, समाजाच्याच हाती असते. जेंव्हा करोडो लोग एखाद्याच्या विचारांचा स्विकार करतात त्या विचारांच समर्थन करतात तेंव्हा त्या विचारात नक्कीच काहीतरी ताकद असणारच की !

गेली जवळ जवळ अडीच दशके डॉ. दाभोलकर अंधश्रध्दा निमूर्लनाच्या कार्यासाठी झटत होते ज्यात त्यांचा कोणताही व्यक्तीगत स्वार्थ नव्हता. फक्त लोकाच्या भल्याचा विचार करत स्वःताचा जीव धोक्यात घालून अंधश्रध्देच्या विरोधात लढणार्या डॉ. दाभोलकरांसारख्या थोर विचावंताची, समाजसेवकाची, लेखकाची, खेलाडूची हत्या होत असेल तर यापुढे समाजासाठी काही करू इच्छिणार्यांना समाजातील दुर्बल घटकांवर होणार्या अन्याया विरूध्द आवाज उटवू इच्छिणार्‍यांना तसरण्यापूर्वी हजारदा विचार करावा लागेल आणि जर तस झाल , तर ते देशाच्या आणि समाजाच्या हिताच ठरणार नाही. डॉ. दाभोलकरांच्या ह्त्तेमुळे फक्त पुरोगामी महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वावर ह्ल्ला झाला अस म्हणण्या इतका हा विषय मर्यादीत नाही. येथे फक्त डॉ. दाभोलकरांची हत्या झालेली नाही तर त्यांच्या विचारांचीही हत्या झालेली आहे. डॉ. दाभोलकरांसारखा विचारवंत संपला की त्यांचे विचारही संपतील या बाळबोध विचारसरणीतून झालेली आहे. या हत्तेचा फक्त निषेध करून जमणार नाही तर त्यांच्या ज्या विचारांसाठी दाभोलकरांना आपल्या जीविताच बलिदान द्याव लागल त्या विचारांची पेटती मशाल तशीच धगधगत ठेवावी लागेल आणि हिच दाभोलकरांना खरी श्रध्दांजली ठरेल.

अंधश्रध्दा निर्मुलनासाठी डॉ. दाभोलकरांनी केलेल्या कार्याची दखल भिवष्यात फक्त आपल्याच देशातच नाही तर जगभरात घेतली जाईल याची खात्री वाटते. श्रध्दा – अंधश्रध्दा या दरम्यानची रेषा कितीही फुसट असली तरी आपल्या देशातील अंधश्रध्देच्या बळीचे आकडे पाहता तो चिंतनाचा नाही तर चिंतेचाच विषय आहे हे स्पष्ट होते. तस असताना जर दाभोलकरांसारखे विचारवंत आपल्या देशाला लाभले नसते तर परीस्थिती आहे त्यापेक्षाही अधिक बिकट असती याकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. डॉ. दाभोलकरांसारख्या थोर विचारवंताच्या सुरक्षेची जबाबदारी खर म्हणजे सरकाराने स्वतःच घ्यायला हवी होती. पण ! तस न झाल्यामुळेच त्यांची हत्या करणार्यांच काम अधिक सोप्प झाल. डॉ. दाभोलकरांच बलिदान व्यर्थ जाणार नाही उलट आता अंधश्रध्देच्या विरोधात अक्का महाराष्ट्र पेटून उटेल अशी आशा वाटते आणि तस झाल तरच डॉ. दाभोलकरांच बलिदान सार्थकी लागल असं म्हणता येईल नाही का ?

—- निलेश बामणे —-

Avatar
About निलेश बामणे 418 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..