नवीन लेखन...

डोंगरावर साकारले कृषि पर्यटन

सातारा जिल्ह्यातील मेढा-महाबळेश्वर परिसरात आता पारंपरिक शेती मागे पडू लागली आहे. कृषि पर्यटनावर आधारित शेती करण्यात अनेक शेतकरी पुढे येत आहेत. मेढा तसेच महाबळेश्वरला लाभलेल्या निसर्ग संपदेचा या परिसरातील शेतकऱयांनी स्वकर्तुत्वाने आणि स्वयंसंशोधनातून पुरेपूर उपयोग करुन आधुनिक शेतीचं बीज रोवलं आहे. कृषि पर्यटनाला या परिसरातील भौगोलिक परिस्थिती आणि निसर्ग संपदेचं

लाभलेलं वरदानही तितकचं महत्वाचं आहे. याच संधीचा लाभ घेऊन करहरच्या प्रगतीशील महिला शेतकरी जयश्री मानकुमरे यांनी मेढा-पाचवडच्या परिसरातील खडकाळ, डोंगराळ भागात जिद्द आणि कष्टातून आधुनिक शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. मेढा-पाचवड परिसरात जयश्री वसंतराव मानकुमरे या प्रगतशील शेतकरी महिलेने जिद्द आणि मेहनतीने खडकाळ आणि डोंगराळ जमिनीत पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शेततळ्यांचा उपयुक्त प्रयोग राबविला. शेततळ्याच्या निर्मितीतून त्यांनी फळबाग लागवड, स्ट्रॉबेरी शेती तसेच ग्रीन हाऊस सारखे उपक्रम यशस्वी केले आहेत. शेती व्यवसाय आधुनिक पध्दतीने करण्याबरोबरच शेतीपूरक प्रक्रिया व्यवसायावर त्यांनी सर्वार्थाने भर दिला आहे. डोंगराळ आणि खडकाळ जमिनीमध्ये मानकुमरे यांनी आपल्या कर्तुत्वाने आणि शेतीक्षेत्रातील ज्ञानामुळे कृषि पर्यटनासारखा नाविण्यपूर्ण उपक्रम यशस्वी करुन दाखविला आहे. जावळी तालुक्यातील करहर येथे जयश्री मानकुमरे यांनी शेती व्यवसाय व शेती व्यवसायाला पूरक जोडव्यवसाय करण्यात पुढाकार घेतला. त्यामध्ये त्यांनी स्वत:ला झोकून दिले. करहर येथे मेढा-पाचवड डोंगरात जेसीबीच्या साह्याने शेतजमीन तयार करून शेततळ्यांची निर्मिती केली. पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना जयश्रीताईंनी शेततळे निर्माण करून त्यावर मात केली आहे. शेततळ्यामुळे पाण्याची गरज भागू लागली. त्य

ुळे या शेतीमध्ये त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे ग्रीन हाऊसची शेती करुन परिसरातील शेतकऱयांसमोर नवा आदर्श निर्माण केला. याबरोबरच शेतीसाठी उच्चप्रतीचे बियाणे तयार करण्यासाठी त्यांनी सुधारित अशी स्वत:ची यंत्रणा तयार केली आहे. स्वत:चे बियाणे तयार करणे, याचबरोबर परिसरातील शेतकऱयांनाही बियाणे तयार करून देणे, यामुळे शेतकऱयांनाही मदत होत आहे. आधुनिक शेती

करताना मानकुमरे या पारंपरिक भात, ज्वारीची पिके घेण्यास विसरल्या नाहीत. त्यांनी आपल्या शेतीच्या काही क्षेत्रावर सुधारित भाताच्या नवीन जाती आणून विक्रमी उत्पादन घेण्याचा नवा इतिहास नोंदविला आहे. शेतजमिनीला विकतचे खत परवडणार नाही, याचा विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपला ओढा गांडूळ खत निर्मितीकडे वळविला. यासाठी आपल्या शेतात त्यांनी गांडूळ खत निर्मितीचे नियोजन करुन उत्पादन वाढविण्यावर भर दिला. शेतीव्यवसायाबरोबरच संकरित गाई-म्हैशीचे संगोपन करून शेणाचा वापर सेंद्रिय खत निर्मितीसाठी केला आहे. तसेच खताचा जमिनीत वापर करण्याची नवी पध्दती विकसित केली आहे.शेती व्यवसायाबरोबरच मानकुमरे यांनी दुग्धव्यवसायाचं नवं दालन आपल्या शेतात निर्माण केलं. गाई तसेच म्हैसपालनाचा व्यवसायही त्यांनी आपल्या शेतावर जोडधंदा म्हणून केला. गाई-म्हैशीच्या दुधाची विक्री न करता स्वत:च त्याचे उपपदार्थ बनवून बाजारात जनतेच्या सोईसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर विक्री करण्याचा नवा पायंडा पाडला. एवढय़ावरच त्या थांबल्या नाहीत तर स्वत: फळ-फुलांची रोपे तयार करून स्वत:च्या शेतीमध्ये लागवड करण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला. आपल्या शेतीमध्ये त्यांनी नारळ, चिकू, फणस आदी झाडांची लागण केली. या फळबागेला आवश्यक तेवढं पाणी मिळावं यासाठी त्यांनी ठिबक सिंचन पध्दतीचा वापर केला. त्यामुळे कमीत कमी पाण्यात आणि कमीत क
ी खर्चात फळबाग तयार करुन परवडणारी शेती करण्याची किमया त्यांनी साधली आहे. मानकुमरे यांनी आपल्या शेतामध्ये ग्रीन हाऊसची उभारणी करून त्यामध्ये जर्बेरासारख्या फुलांची लागवड करून विक्रमी उत्पादन घेतले. जावळी तालुक्यातून महाबळेश्वर, पाचगणीला जाण्यासाठी मुख्य रस्ते आहेत. या रस्त्याने महाबळेश्वर पाचगणीला पर्यटनासाठी जाणाऱया पर्यटकांना शेतकरी काय असतो व त्याचे जीवन काय असते हे उमगण्यासाठी त्यांनी आपल्या शेतावर खास व्यवस्था केली आहे. जिद्द आणि कष्टातून फोंडय़ा माळरानातील डोंगर फोडून तयार केलेल्या शेतीत घेतलेली विविध पिके आणि शेती आधारित प्रक्रिया उद्योगामुळे जयश्री मानकुमरे यांच्या शेतात कृषि पर्यटनाचा विकास झाला आहे.

— बातमीदार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..