एक ढेकूण मी पाहिला
आपल्याच आईच रक्त शोषून पिणारा.
बायकोच्या ताटा खालच मांजर झालेला…
एक ढेकूण मी पाहिला
जगासाठी श्रीमंत असणारा…
आईच्या औषधासाठी भिक लागलेला…
एक ढेकूण मी पाहिला
आईच्या मृत्यूची वाट पाहणारा…
सर्व लाज सोडून निर्लज्य झालेला..
एक ढेकूण मी पाहिला
आईच्या मृत्यूसाठी देवासही वेटीला धरणारा…
मानूस असूनही ढेकणाचं जीवन जगणारा…..
कवी-निलेश बामणे.
— निलेश बामणे
Leave a Reply