नवीन लेखन...

ढोल्या गणपती – नाशिक

 पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद, आणि विद्यमान नाशिक अशी चार नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील “पंचवटी” येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. मुघल साम्राज्याच्या काळात नाशिक ‘गुलाबांचे शहर’ म्हणून ‘गुलशनाबाद’ या नावाने ज्ञात होते. या शहराला “नाशिक” हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. “नऊ शिखरांचे शहर” म्हणून “नवशिख” आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे. राम, त्यांची पत्नी सीता आणि बंधु लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असताना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत भाषेमध्ये “नासिका”) लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नासिकचा डोंगर ही सह्याद्रीच्या नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे.

भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात गंगा म्हणतात.

मंदिराचे शहर व धार्मिक महत्त्व असलेल्या नाशिकमध्ये काही प्रसिध्द गणपती मंदिरे आहेत. त्यापैकी एक आहे ढोल्या गणपती. शहरातील सर्वांत भव्य गणपती असल्याने त्याच्या भव्यतेमुळेच त्याला “ढोल्या गणपती” म्हणून संबोधले जाते. लंबोदर, विशालकाय अशी विशेषणे शोभतील अशी ही भव्य मूर्ती आहे. नाशिकमधील अशोकस्तंभाजवळ हे मंदिर आहे. पूर्वीच्या काळी गावाबाहेर, हद्दीवर मारुती, गणपती, भैरवनाथाची मंदिरे स्थापन करण्याची परंपरा आहे. ही सर्व संकटमोचन व विघ्नहर्ते असल्याने त्यांची मंदिरे गावाबाहेर स्थापन होत. या परंपरेनुसार ढोल्या गणपतीचे मंदिर गावाबाहेर स्थापण्यात आले. पूर्वी नाशिक शहराची हद्द अशोकस्तंभापर्यंतच होती; परंतु आता शहराच्या वाढत्या विस्तारीकरणाने हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आले आहे.

या मंदिराची स्थापना सुमारे तीनशे वर्षांपूर्वी करण्यात आली. मंदिरातील ढोल्या गणपतीची मूर्ती अतिशय प्राचीन व प्रभावी आहे. तिची उंची ७ फूट उंच व ४ फूट रुंद आहे. ही मूर्ती काळ्या दगडाची असून, तिला नित्याने शेंदूर लावल्याने मूर्ती शेंदरी रंगाची झाली आहे. या मंदिराचा गाभारा मोदकासारखा आहे. १० ते १५ वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोध्दार केला गेला.

ढोल्या गणपती अत्यंत मानाचा, नवसाला पावणारा व प्रचंड श्रध्दा असलेला असल्याने संकष्टचतुर्थीच्या दिवशी असंख्य भाविक गजाननाचे दर्शन घेण्यास येतात. या दिवशी मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम केले जातात. तसेच या मंदिरात गणेश उत्सवही मोठा प्रमाणात साजरा केला जातो. यावेळेस मंदिरात उत्सवाचे वातावरण असते. या मंदिराची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे.

।। ॐ गं गणपतये नम: ।।



— जगदीश पटवर्धन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..